Join us

निर्मात्यासाठी सई ताम्हणकरने पायाला दुखापत झालेली असताना घेतला मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2020 4:18 PM

निर्मात्यांचे नुकसान होऊ नये म्हणून सईने हे पाऊल उचलले. 

कोरोनामुळे आतापर्यंत 7000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतातील रुग्णांची संख्या 140 पर्यंत पोहोचली आहे. याचा फटका  सर्वसामान्य नागरिक ते बॉलिवूड सेलिब्रेटीपर्यंत सगळ्यांचा बसला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 19 मार्चपासून फिल्मइंडस्ट्रीने शूटिंग बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आपल्या महाराष्ट्राची हास्यजत्रा या कॉमेडी रिएलिटी शोच्या निर्मात्यांचे नुकसान होऊ नये म्हणून पायाला दुखापत झालेली असतानाही अभिनेत्री सई ताम्हणकरने या शोचे शूटिंग पूर्ण केले.  महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोची सई जज आहे. निर्मात्यांचे नुकसान होऊ नये म्हणून सईने हे पाऊल उचलले. 

काही दिवसांपूर्वी राजस्थानमध्ये बॉलिवूडचा सिनेमा मिमीच्या सेटवर पायाला दुखापत झाली होती. मिमीच्या शूटिंग दरम्यान सई ताम्हणकरच्या पायाला फ्रॅक्चर झाले आहे. सिनेमाचे शूटिंग करुन हॉटेलवर परतत असताना तिचा पाय मुरगळला आणि सूज आली. डॉक्टरकडे घेऊन गेल्यावर पाय फ्रेक्चर झाल्याचे कळले. मात्र तरीही अशा परिस्थिती  सईने शूटिंग पूर्ण केले होते. 

मिमी हा सिनेमा  'मला आई व्हायचंय' या मराठी सिनेमावर आधारित आहे. त्यामुळे सिनेमात काहीसा भावनिक अँगलही पाहायला मिळेल.यात क्रिती सॅनन सरोगेट मदरची भूमिका साकारणार आहे. या सिनेमात पंकज त्रिपाठी, सुप्रिया पाठक यांच्या देखील महत्त्वाच्या भूमिका आहेत.. लक्ष्मण उत्तेकर या सिनेमाचे दिग्दर्शन करतायेत. 2020मध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

टॅग्स :सई ताम्हणकर