Interview : स्टनिंग लूक अविस्मरणीय ठरेल !
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2017 10:12 AM
-रवींद्र मोरे यंदा कर्तव्य आहे, चेकमेट, डबलसीट, ती सध्या काय करते, दगडी चाळ, माझा नवरा तुझी बायको आदी मराठी ...
-रवींद्र मोरे यंदा कर्तव्य आहे, चेकमेट, डबलसीट, ती सध्या काय करते, दगडी चाळ, माझा नवरा तुझी बायको आदी मराठी चित्रपटांद्वारे प्रमुख भूमिका साकारलेला आणि तरुणांच्या गळ्यातला ताईत अंकुश चौधरी आपणास स्टनिंग लूकमध्ये दिसत आहे. विशेष म्हणजे त्याचा हा लूक त्याने त्याचा आगामी चित्रपट ‘देवा : एक अतरंगी’ यासाठी केला असून तरुणांना आकर्षित करीत आहे. या चित्रपटाच्या प्रवासाबाबत अंकुशसोबत ‘सीएनएक्स’ने मारलेल्या दिलखुलास गप्पा...* प्रश्न : या चित्रपटात तुझा स्टनिंग लुक दिसून येत आहे, याबाबत काय सांगशिल?- प्रत्येक चित्रपटात काहीतरी वेगळेपण असावे, जेणेकरुन ते लोकांच्या लक्षात राहील. या चित्रपटातही जो माझा लुक आहे, तो चित्रपटातील भूमिकेला अनुसरुनच आहे. चित्रपटाची टॅग लाइन ‘एक अतरंगी’ हे आहे. त्यानुसारच माझी हेअरस्टाइल आणि कपडे आहेत. माझ्या मते हा लुक लोकांना अविस्मरणीय ठरणारा आहे. * प्रश्न : या चित्रपटाची शूटिंग कोकणात झाली आहे, तेथील अनुभव कसा वाटला?- खूपच छान अनुभव आला. तिथे प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्ट नवीन वाटली. आम्ही कोकणात पावसातही शूटिंग के ली आणि थंडीतही. तेथील निसर्गरम्य परिसर मनाला खूपच आल्हाददायक वाटायचा. माझ्या मते आपल्या महाराष्ट्रातच बरेच असे काही चांगले लोकेशन्स आहेत, जे शूटिंगसाठी अगदी परफेक्ट आहेत. त्यामुळे मला नाही वाटत की, शूटिंगसाठी बाहेर जाण्याची गरज पडेल. * प्रश्न : या चित्रपटाचे वेगळेपण काय आहे?- आज प्रत्येकाच्या आयुष्यात काहीना काही अडचणी, समस्या आहेत. तर या चित्रपटातील देवा हे कॅरेक्टर असे आहे, जे इतरांना सकारात्मक ऊर्जा प्रदान करते. शिवाय या चित्रपटातील नायिका तेजस्विनी पंडीत ही लेखिके च्या भूमिकेत असून ती देवाला शोधण्याचा प्रयत्न करीत असते. तिला खूप लोक भेटतात मात्र तिला अपेक्षित देव भेटत नाही, मात्र माझ्या रुपाने तिला हा देव भेटतो. हा देव नेहमी इतरांना सकारात्मक ऊर्जा प्रदान करत असतो, ज्यामुळे त्यांच्या समस्या सुटतात. खरे म्हणजे ही ऊर्जा प्रत्येकाच्या अंतरंगात लपलेली आहे. त्याच ऊर्जेचे महत्त्व या चित्रपटात दाखविलेले आहे. * प्रश्न : या चित्रपटाची नायिका तेजस्विनी पंडीतसोबत तुझी केमिस्ट्री कशी वाटली?- तेजस्विनी खूपच सेन्सेटिव्ह अॅक्ट्रेस आहे. अगं बाई अरेच्चा, मी सिंधुताई सपकाळ, वावटळ, रानभूल आदी चित्रपटातील तिने साकारलेली भूमिका अत्यंत गौरवास्पद आहे. तिच्यासोबत काम करण्याचा अनुभव मला खूपच वेगळा वाटला तसेच खूप मजाही आली. * प्रश्न : मराठीतही येऊ लागलेल्या वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांना विरोध होताना दिसत आहे, याबाबत काय सांगाल?- मी याबाबत काहीच प्रतिक्रिया देऊ इच्छित नाही. उगाच त्याचा परिणाम माझ्या आगामी चित्रपटावर होईल.