अभिनेत्री प्रार्थना बेहरे (Prarthana Behere) सतत चर्चेत येत असते कधी तिच्या आगामी प्रोजेक्टमुळे तर कधी ग्लॅमरस फोटोंमुळे. आता ती लवकरच 'चिकी चिकी बुबूमबूम' (Chiki Chiki Booboom Boom Movie) सिनेमात दिसणार आहे. या चित्रपटाचे सध्या ती जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. नुकतेच तिने एका मुलाखतीत लग्नाच्या आधीपासून तिला एक मुलगा असल्याचा खुलासा केला आहे.
प्रार्थना बेहरे हिने नुकतेच सुमन म्युझिकच्या आम्ही असं ऐकलंय या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी तिने एक धक्कादायक खुलासा केला आहे. तिला लग्नाच्या आधीपासून एक मुलगा असल्याचा खुलासा केला. प्रार्थना म्हणाली की, मला एक मुलगा तर लग्नाच्या आधी पण होता. त्याचं नाव आहे गब्बर. जो माझा सगळ्यात मोठा डॉग आहे. सात डॉग घरी आहेत. त्याच्या व्यतिरिक्त फार्म हाउसमध्ये गायी आहेत. आताच एका वासरुचा जन्म झालाय. १०-१२ घोडे आहेत. माझी खूप मुलं आहेत. त्यामुळे मी आणि माझा नवरा आता म्हणतो की, मनुष्याची मुलं नको. हीच मुलं खूप आहेत. हीच मुलं आपली मुलं आहेत.
''निस्वार्थ प्रेम प्राण्यांकडून मिळते...''
पुढे प्रार्थनाला विचारण्यात आलं की, या मुलांच्या बाबतीत तुझा नवरा अभिषेक खूपच पझेसिव्ह आहे का?, त्यावर अभिनेत्री म्हणाली की, खूप जास्त. त्याचे प्राण्यांवर खूप प्रेम आहे. त्याच्या बालपणापासूनच त्यांच्याकडे प्राणी पाळले होते. त्यामुळे त्याला प्राण्याची खूप आवड आहे. मला पण आधीपासून आवड होती. मी प्राणी प्रेमी होते पण प्राणी कधी पाळले नव्हते. पण आता इतकी सवय झाली आहे की, त्यांच्याशिवाय राहू शकत नाही. निस्वार्थ प्रेम प्राण्यांकडून मिळते. कोणावर चिडायचे नाही, रागवायचे नाही, हे मी माझ्या प्राण्यांकडून शिकले आहे. प्राण्यांना सांभाळणे कठीण आहे. पण आवड असली की सगळं मॅनेज होतं. आम्ही गायी, घोड्यांच्या देखभालीसाठी माणसं ठेवली आहेत. आपण आपल्या मुलांवर प्रेम करतो. तर त्यांच्यात पण जीव असतं. मग त्यांना प्रेम मिळालं पाहिजे ना.