Join us

दारु पिऊन निर्मिती सावंत यांनी केला 'झिम्मा 2' मधला सीन?; अभिनेत्रीने सांगितला रंजक किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2023 8:59 AM

Nirmiti sawant: दारु पिण्याचा सीन कसा शूट झाला हे निर्मिती सावंत यांनी सांगितलं आहे.

सध्या मराठी कलाविश्वासह प्रेक्षकांमध्ये हेमंत ढोमे (hemant dhome) याच्या 'झिम्मा 2'   (jhimma 2) या सिनेमाची जोरदार चर्चा रंगली आहे. येत्या २४ नोव्हेंबर रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे सध्या या सिनेमातील अभिनेत्री आणि त्यांचे एकसे बढकर एक किस्से सोशल मीडियावर चर्चिले जात आहेत. यामध्येच या सिनेमा अभिनेत्री निर्मिती सावंत यांचा दारु पितानांचा एक सीन आहे. त्यांचा हा सीन पाहिल्यावर त्यांनी खरोखरच दारु पिऊन हा सीन शूट केला होता का? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला होता. या प्रश्नाचं निर्मिती सावंत यांनी उत्तर दिलं आहे.

सध्या 'झिम्मा 2' ची संपूर्ण टीम सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. त्यामुळे या सिनेमाच्या निमित्ताने ते अनेक ठिकाणी भेट देत आहेत. चाहत्यांशी संवाद साधत आहेत. यात नुकतीच त्यांनी 'राजश्री मराठी'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी सिनेमामध्ये त्यांनी खरी दारु प्यायली की नाही हे  सांगितलं.

झिम्मा 2 च्या ट्रेलरमध्ये निर्मिती सावंत (nirmiti sawant) यांचा एक सीन दाखवण्यात आला आहे. ज्यात त्या दारु पितांना दिसत आहेत. त्यांचा हा सीन सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. इतकंच नाही तर त्याच्यावरुन काही भन्नाट मीम्सही तयार करण्यात आले. हा सीन नेमका कसा शूट करण्यात आला हे त्यांनी सांगितलं.

"तुम्हाला सगळ्यांनाच मजा वाटेल या गोष्टीची. पण, मला दारु, सिगारेट, तंबाखू अगदी चहा सुद्धा यापैकी कसलंच व्यसन नाहीये. आणि, मला माहित नाही कसं पण ते दारुचे सीन माझ्याकडून खूप छान होतात. मला बरेच जण विचारतात. मग मला असं वाटतं की निरीक्षणामुळे असं असेल का? तर नाही. कारण, मी कधीच असं कोणाचं निरीक्षण केलेलं नाही. मी विचार केला की निर्मला गावची मोकळी ढाकळी बाई आहे. तिने जर अशी दारु प्यायली आणि तिला चढली तर ती कशी वागेल बिचापी. जे लोकांना आवडतंय ना मी जशी ट्रेलरमध्ये हसते ते आपोआप आलंय. मी फक्त स्वत:ला बजावतेय की तू निर्मला कोंढेपाटील आहे", असं निर्मिती सावंत म्हणाल्या.

पुढे त्या म्हणतात, 'मग त्या रिऍक्शन प्रेक्षकांना आवडतात. एका सीनच्या वेळी तर मी हेमंतला बाहेर काढलं होतं. कारण, तो खूप हसत होता.  त्याचं हसू पाहून मला हसू येत होतं. एका सीनला तर आमचा डीओपी हेमंतच्या खांद्याला चावला. कारण, आमचे सीन पाहून त्याला इतकं हसू येत होतं. की हसू बाहेर पडू नये म्हणून त्याने चक्क हेमंतच्या खांद्याला चावा घेतला.  दरम्यान, २४ नोव्हेंबरला प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमा निर्मिती सावंत, रिंकू राजगुरु, शिवानी सुर्वे, सुचित्रा बांदेकर, सायली संजीव, क्षिती जोग, सुहास, सिद्धार्थ चांदेकर ही कलाकार मंडळी मुख्य भूमिकेत झळकले आहेत.

टॅग्स :सिनेमासेलिब्रिटीरिंकू राजगुरूसिद्धार्थ चांदेकरशिवानी सुर्वे