Join us

"हा निर्णय कठीण होता, पण...", सई ताम्हणकरने अनिश जोगसोबत ब्रेकअप झाल्याची दिली कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2024 09:20 IST

Saie Tamhankar : सई ताम्हणकर सध्या वैयक्तिक कारणामुळे चर्चेत आली आहे. तिचे अनिश जोगसोबत ब्रेकअप झाल्याची कबुली दिली आहे.

मराठी सिनेइंडस्ट्रीतील परमसुंदरी म्हणजेच अभिनेत्री सई ताम्हणकर (Saie Tamhankar) सतत चर्चेत येत असते. अलिकडेच तिची मानवत डायरिज ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. यात तिने साकारलेली समंद्री सर्वांना भावली. दरम्यान आता ती पुन्हा चर्चेत आली आहे. मात्र यावेळी ती खासगी कारणांमुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्रीने तिच्या लाँग टर्म बॉयफ्रेंड अनिश जोगसोबत ब्रेकअप केले आहे.

निर्माता अनिश जोगसोबतच्या ब्रेकअपच्या चर्चेला अखेर सई ताम्हणकरने दुजोरा दिला आहे. खरेतर, काही आठवड्यांपूर्वी सईने तिच्या इंस्टाग्रामवर एक क्रिप्टिक पोस्ट शेअर केली होती, ज्यामध्ये लिहिले होते, 'मी माझ्या इच्छेने सिंगल आहे. ही माझी इच्छा नाही, पण तरीही हा एक पर्याय आहे.' ही पोस्ट शेअर करण्यासोबतच तिने प्रियकर अनिशसोबतचे तिचे सर्व फोटोही डिलीट केले. या पोस्टनंतर सोशल मीडियावर तिचे ब्रेकअप झाल्याची चर्चा सुरू झाली होती. या चर्चेवर आता तिने स्वतः प्रतिक्रिया दिली आहे.

सईने ब्रेकअपची दिली कबुलीएचटी सिटीशी बोलताना अभिनेत्रीने तिच्या ब्रेकअपच्या चर्चेला कबुली दिली आहे. जेव्हा तिला त्याच्या नात्याबद्दल विचारण्यात आले तेव्हा ती म्हणाली की, 'हो, आम्ही वेगळे झालो आहोत आणि हा परस्पर निर्णय होता. हा निर्णय कठीण होता, परंतु ते घडले आणि आता हेच आहे. तो माझ्या आयुष्यातील खूप खास व्यक्ती आहे आणि नेहमीच राहील. मी त्याला शुभेच्छा देते आणि मला माहित आहे की त्यालाही असेच वाटत असेल.

अभिनेत्रीचा पहिला झालाय घटस्फोटसई ताम्हणकरने २०१३ मध्ये व्हिज्युअल इफेक्ट आर्टिस्ट अमेय गोसावीसोबत लग्न केले. मात्र, त्यांचे नाते फार काळ टिकले नाही आणि २०१५ मध्ये दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. यानंतर सई आणि अनिशचे नाते सुरु झाले. अनीश हा व्यवसायाने चित्रपट निर्माता आहे. त्याने 'वायझेड', 'गर्लफ्रेंड' आणि 'धुरळा'सह अनेक चित्रपट केले आहेत.

टॅग्स :सई ताम्हणकर