प्रसिद्ध अभिनेता चिराग पाटील(Actor Chirag Patil)ने नुकतीच चाहत्यांना खुशखबर दिली आहे. तो दुसऱ्यांदा बाबा झाला आहे. त्याला कन्यारत्न प्राप्त झाल्याचे सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सांगितले आहे. त्याच्या या पोस्टवर चाहत्यांसोबत सेलिब्रेटीदेखील अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत.
अभिनेता चिराग पाटीलने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. ज्यात त्याने लिहिलंय की, मुलगी झाली. तिचं नाव दीया ठेवलंय. तिचा जन्म २३ एप्रिल, २०२५ रोजी रात्री ११.३७ मिनिटांनी झाला आहे. मी आणि सना खूप खूश आहोत. मोठी बहिण रियानादेखील खूप आनंदी आहे. त्याने या पोस्टसोबत कॅप्शनमध्ये लिहिले की, पाटील प्रॉडक्शन नंबर २ दीया!! अभिनेत्याच्या या पोस्टवर शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे. आदिनाथ कोठारे, कश्यप परुळेकर, स्मिता गोंदकर या कलाकारांनी त्याचे अभिनंदन केले आहे.
अभिनेता चिराग पाटीलने ३० ऑक्टोबर, २०२४ रोजी चाहत्यांना ही गोड बातमी हटके अंदाजात दिली होती. त्याने सोशल मीडियावर लहान बाळाचे कपडे आणि त्यावर हार्ट शेप असलेला फोटो शेअर केला होता. त्यावर लवकरच असे लिहिले होते आणि त्या कपड्याखाली मजकूरात लिहिले होते की, सना आणि चिराग प्रॉडक्शन पार्ट २. एप्रिल २०२५.
वर्कफ्रंटअभिनेता चिराग पाटीलने वजनदार सिनेमातून मराठी कलाविश्वात पदार्पण केले. तो भारताच्या प्रसिद्ध माजी क्रिकेटर संदीप पाटील यांचा मुलगा असून त्याने 'वजनदार' शिवाय 'राडा रॉक्स', 'असेही एकदा व्हावे' अशा विविध चित्रपटात काम केलं आहे. याशिवाय '८३', 'चार्जशीट', 'ले गया सद्दाम' अशा हिंदी चित्रपटातही त्याच्या अभिनयाची जादू दाखवली आहे.