मैत्री म्हणजे नेहमी सोबत देणारी साथ, आपला मदतीचा हात, जपून ठेवावी अशी सुंगधी कुपी आणि आपल्या हक्काची जादू की झप्पी! त्यात अनेकजण मैत्रीत काहीही करायला तयार असतात. असेच काहीसे मराठी सिनेइंडस्ट्रीतील या तीन अभिनेत्रींनी मैत्रीसाठी काहीपण म्हणत आपल्या डोक्याच्या मागील बाजूचे केस मुळासकट काढले आहेत आणि सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत. त्याचे हे फोटो पाहून त्याचे चाहते अवाक् झाले आहेत. या अभिनेत्री म्हणजे मनवा नाईक, अदिती सारंगधर आणि अमृता संत.मनवा नाईक, आदिती सारंगधर आणि अमृता संत.या तिघींनी एकत्र येत आपल्या मैत्रीतील मजामस्ती आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. एक व्हिडिओ शेअर करून मनवा नाईकने आम्ही फ्रेंड्स आहोत की कोण? असे म्हणत डोक्याच्या पाठीमागील भागाचे केस मुळासकट काढून टाकले आहेत. या व्हिडीओत या तिघी भलत्याच आनंदी दिसत आहेत. या तिघींनी असे का केले असा अनेकांना प्रश्न पडला आहे.
तर आदिती सारंगधर स्वराज्यजननी जिजामाता मालिकेतून बेगम साहिबाची भूमिका निभावत आहे. अमृता संत बऱ्याच नाटकांमध्ये झळकली आहे.