Join us

LockDown दरम्यान जॅकलिनचा हा व्हिडीओ होतोय व्हायरल, टॉवेल गुंडाळत करते डान्स !

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2020 10:17 AM

जॅकलिन स्वत:ला फिट ठेवण्यासाठी दिवसातून 108 वेळा सूर्य नमस्कार करते.

जॅकलिन फर्नांडिसची बातच न्यारी, श्रीलंकन ब्युटी म्हणून ओळखली जाणारी जॅकलिन जे काही करते ते खासच असते. आपली स्टाईल आणि फॅशनबाबतही तितकीच ती सजग असते.  कोणत्या कार्यक्रमात कशी स्टाईल आणि फॅशन असावी हे ती उत्तमरित्या जाणते.

विशेष म्हणजे कोणतीही स्टाईल आणि फॅशन तिच्या सौंदर्याला चारचाँद लावते. नेहमीच तिच्या हॉट आणि ग्लॅमरस लूकमुळे  सोशल मीडियावरही रसिकांची मनं जिंकण्यात ती यशस्वी ठरते. अगदी त्याचप्रमाणे तिचा हा अंदाज रसिकांनाही नक्कीच पसंत पडल्याशिवाय राहणार नाही. याआधीही विविध फोटोशूटमधून आपल्या दिलखेचक फोटोशूट करत रसिकांना  तिने घायाळ केलं होतं. 

तिच्या प्रत्येक अंदाजावर तिचे चाहते भरभरून प्रतिसाद देत असल्याचे पाहायला मिळते. सोशल मीडियावर सध्या ती प्रत्येक अपडेट शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असते. अशातच जॅकलिनचा एक व्हिडीओ समोर आला आहे. अर्थात हा व्हिडीओ जुना आहे. मात्र सध्या हा सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.  यात ती चक्क टॉवेलमध्ये डान्स करताना पाहायला मिळते.  हा व्हिडीओ तिच्या एका फोटोशूटदरम्यानचा आहे. फोटोशूटमध्ये जॅकलिन विवध पोज देत असतानाच अचानक डान्स करायला लागते असा हा व्हिडीओ आहे. व्हिडीओत अंदाज जितका ग्लॅमरस, रॉकिंग आहे तितकीच त्यात नजाकतही असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे जॅकलिनचा हा व्हिडीओ काहीसा वेगळा ठरत असून तिच्या चाहत्यांसाठी एंटरटेनिंगही ठरत आहे.

तसेच स्वत:ला फिट ठेवण्यासाठी दिवसातून 108 वेळा सूर्य नमस्कार करते. ती नियमितपणे आष्ठांग योगही करते.  कोरोनापासून बचावासाठी ती सध्या बाहेर न पडता घरातच राहून योगा करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

टॅग्स :जॅकलिन फर्नांडिस