Join us

Janmashtami 2018 : श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त मराठी गीतांची मैफिल!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2018 2:25 PM

आज कृष्ण जन्माष्टमी संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हणजे सामाजिकता, आध्यात्मिकता, एकता आणि व्यवस्थापकीय कौशल्य दाखवणारा सण आहे.

आज कृष्ण जन्माष्टमी संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हणजे सामाजिकता, आध्यात्मिकता, एकता आणि व्यवस्थापकीय कौशल्य दाखवणारा सण आहे. अनेक पद्धतींनी वेगवेगळ्या संस्कृती आणि परंपरांनुसार हा सण संपूर्ण देशभरात उत्साहात साजरा केला जातो. श्रीकृष्ण म्हणजे विष्णूचा आठवा अवतार. भगवान विष्णूने पृथ्वी तलावर घेतलेल्या अवतारांपैकी कृष्ण हा विष्णूचा एकमेव पूर्णावतार आहे. श्रीकृष्ण आणि रासलीला हे जुळलेलं समीकरण. कृष्णाच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू आपल्याला भूरळ घालतात. काहींना त्याचं रूप भूरळ घालतं तर काहींना त्याची बुद्धिमत्ता भावते. खरं पाहायला गेलं तर कृष्ण म्हणजे साधा सरळ, लाडिक आणि त्यातून जीवनाचा सार सांगणारा उत्तम वक्ता. संपूर्ण जगाला कृष्णाच्या मोहक रूपाची भूरळ पडली आहे. अशातच श्रीकृष्णावर अनेक गाणी रचली आहेत. मराठी चित्रपट सृष्टीतही अनेक श्रीकृष्णाला अर्पण केलेली गाणी, भावगीतं आहेत. अशीच काही गाणी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत...

1. सांगा मुकूंद कुणी हा पाहिलाचित्रपट – अमर भुपाळी

2. कशी गवळण राधा बावरलीचित्रपट: एक गाव बारा भानगडीसंगीत दिग्दर्शक: राम कदमगायक: सुमन कल्याणपूरकर

3. अगं नाच नाच राधे उडवुया रंगचित्रपट: गोंधळात गोंधळगायक: सुरेश वाडकर, उत्तरा केळेकर

4. सांज ये गोकुळी सावळी सावळीचित्रपट: वजीरगायक: आशा भोसले.संगीत दिग्दर्शक: श्रीधर फडके

5. घननीळा, लडिवाळा झुलवु नको हिंदोळाचित्रपट – उमज पडेल तरगीत – ग. दि. माडगूळकरसंगीत – सुधीर फडके

6. झुलतो बाई रासझुलाचित्रपट: जानकीगायक: लता मंगेशकर

7. किती सांगू मी सांगू कुणालाचित्रपट: सतीचं वाणगीत: जगदीश खेबुडकरसंगीत: प्रभाकर जोगगायक: आशा भोसले

8. आज गोकुळात रंग खेळतो हरीगायक: लता मंगेशकर

9. अरे मनमोहना कळली नाही तुलाचित्रपट: बाळा गाऊ कशी अंगाईगायक: आशा भोसलेसंगीत दिग्दर्शक: एन. दत्ता

टॅग्स :जन्माष्टमी 2018