Join us

जावई विकत घेणे आहे फेम तन्वी पालव अडकली या अभिनेत्यासोबत लग्नबंधनात, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2019 17:16 IST

तन्वीचे नुकतेच लग्न झाले असून तिच्या पतीनेच सोशल मीडियाद्वारे ही गोष्ट सगळ्यांना सांगितली आहे. तिचा नवरा प्रसिद्ध अभिनेता आणि गायक आहे.

ठळक मुद्देतन्वीचे 21 डिसेंबरला दाक्षिणात्य अभिनेता सिद्धार्थ मेननसोबत लग्न झाले. सिद्धार्थ हा अभिनेता असण्यासोबतच गायक देखील आहे.

झी मराठी वरील जावई विकत घेणे आहे ही मालिका एकेकाळी चांगलीच गाजली होती. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखांना खूप चांगली लोकप्रियता मिळाली. या मालिकेत मुख्य भूमिकेत प्रेक्षकांना तन्वी पालवला पाहायला मिळाले होते. तिची या मालिकेतील भूमिका प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. या मालिकेप्रमाणेच तिने व्हॅक्यूम क्लिनर या नाटकात देखील काम केले होते. तन्वीच्या फॅन्ससाठी एक खुशखबर आहे. तन्वीचे नुकतेच लग्न झाले असून तिच्या पतीनेच सोशल मीडियाद्वारे ही गोष्ट सगळ्यांना सांगितली आहे.

तन्वीचे 21 डिसेंबरला दाक्षिणात्य अभिनेता सिद्धार्थ मेननसोबत लग्न झाले. सिद्धार्थ हा अभिनेता असण्यासोबतच गायक देखील आहे. तन्वीच्या मेहंदी कार्यक्रमाचे फोटो स्नेहा रायकर यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत तर सिद्धार्थने तन्वीचा फोटो शेअर करत सोशल मीडियाद्वारे ही गुड न्यूज सगळ्यांना सांगितली आहे. सिद्धार्थने इन्स्टाग्रामवर तन्वीचा फोटो शेअर करत लिहिले आहे की, प्रत्येक प्रेम कथा सुंदर असते... आमची कथा तर मला खूपच आवडते. माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम निर्णय आज मी घेत असून मी माझ्या जिवलग मैत्रिणीसोबत लग्न करतोय...

सिद्धार्थने त्याचसोबत लग्नातील एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत ते दोघे खूपच छान दिसत आहेत. सोशल मीडियाद्वारे त्यांच्या फॅन्सनी त्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. केवळ एका तासात या फोटोला 10 हजारावरून अधिक लोकांनी लाईक केले आहे. 

सिद्धार्थ हा अभिनेता असण्यासोबतच थाईकुडम ब्रिज या बॅण्डसाठी त्याला ओळखले जाते. त्याच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर त्याचे परफॉर्म करतानाचे अनेक फोटो आपल्याला पाहायला मिळतात. 

टॅग्स :टेलिव्हिजन