हिंदी आणि मराठी सोबतच दाक्षिणात्य चित्रपटातही जयवंत वाडकर यांनी काम केलं आहे. चित्रपट, मालिका आणि नाटकांमध्ये त्यांनी एकाहून एक सरस भूमिका साकारल्या आहेत. आज त्यांचा वाढदिवस असून त्यांचे चाहते त्यांना सोशल मीडियाद्वारे शुभेच्छा देत आहेत.
जयवंत वाडकर यांनी १९८८ साली 'तेजाब' या हिंदी चित्रपटातून करिअरची सुरुवात केली. तर मराठीत त्यांनी १९८८ साली एक गाडी बाकी अनाडी या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत एन्ट्री केली. आतापर्यंत त्यांनी मराठीत १०० हून अधिक तर हिंदीत ४५ हून अधिक चित्रपटात काम केले आहे. याशिवाय छोट्या पडद्यावरही त्यांनी भरपूर काम केले आहे. जयवंत वाडकर यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. तन्मय वाडकर हे त्यांच्या मुलाचे नाव असून स्वामिनी हे मुलीचे नाव आहे.
जयवंत वाडकर यांची कन्या स्वामिनी वाडकर हिनेदेखील वडिलांचा अभिनयाचा वारसा पुढे नेण्याचे ठरवले आहे. स्वामिनीने महेश मांजरेकरांच्या 'एफ यू' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केेले होते. तसेच सचिन पिळगावकर यांच्या 'ये है आशिकी' या चित्रपटात तिने काम केले होते.
स्वामिनी सोशल मीडियावर सक्रिय असून तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अनेक ग्लॅमरस फोटोज शेअर करत असते.