Join us

बॉक्स ऑफिसवर 'झिम्मा 2'ची यशस्वी घोडदौड; पार केला १० कोटींचा टप्पा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2023 18:28 IST

jhimma 2: जाणून घ्या, नेमकी किती झाली 'झिम्मा 2' ची आतापर्यंत एकूण कमाई

2023 हे वर्ष कलाविश्वासाठी प्रचंड खास ठरलं आहे. मराठीसह बॉलिवूडमध्येही अनेक दर्जेदार सिनेमांची निर्मिती झाली. इतकंच नाही तर या वर्षात अनेक सिनेमा बॉक्स ऑफिसवर गाजले. त्यातलाच एक सिनेमा म्हणजे हेमंत ढोमे दिग्दर्शित 'झिम्मा 2' . बॉलिवूड सिनेमांच्या गर्दीत या मराठमोळ्या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर त्यांचा चांगलाच गड राखला. इतकंच नाही तर या सिनेमाने बक्कळ कमाई सुद्धा केली आहे.

यंदाच्या वर्षात झिम्मा 2 हा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला असून आतापर्यंत त्याने 2023 मध्ये सर्वाधिक कमाई केली आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षात सर्वाधिक कमाई करणारा हा दुसरा सिनेमा ठरला आहे. आतापर्यंत या सिनेमाने तब्बल १४ कोटींची कमाई केली आहे.

दरम्यान, आनंद एल राय निर्मित 'झिम्मा 2' या सिनेमाने देशासह विदेशातही लोकप्रियता मिळवली आहे. त्यामुळे सध्या या सिनेमाची टीम त्याचा जल्लोष साजरा करत आहे.  या सिनेमात सुहास जोशी, सायली संजीव, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, शिवानी सुर्वे, सिद्धार्थ चांदेकर, निर्मिती सावंत, रिंकू राजगुरू या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. या सिनेमातील गाण्यांनाही प्रचंड लोकप्रियता मिळत आहे. 

टॅग्स :सिनेमासिद्धार्थ चांदेकरसायली संजीवसेलिब्रिटीमराठी अभिनेतारिंकू राजगुरू