Join us

आईला ‘या’ नावाने हाक मारतो जितेंद्र जोशी; स्वत: केला खुलासा, वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2023 17:15 IST

मराठी अभिनेता जितेंद्र जोशी 'नाळ २' या सिनेमाद्वारे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

मराठी अभिनेताजितेंद्र जोशी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. तो चाहत्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरं देत असतो. केवळ सामाजिक गोष्टीच नव्हे तर बऱ्याचदा तो आपल्या आयुष्यात आलेल्या वैयक्तिक अनुभवांबद्दल सुद्धा लिहत असतो. शिवाय आपल्या आईवरही तो भरभरुन लिहीत असतो. नुकतेच त्याने आईला कोणत्या नावाने हाक मारतो, याचा खुलासा केला आहे. तसेच त्यामागचं कारणही त्याने सांगितलं आहे. जितेंद्र 'नाळ २' या सिनेमाद्वारे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सध्या या सिनेमाचे जोरदार प्रमोशन सुरू आहे. त्यामुळे चित्रपटातील कलाकार वेगवेगळ्या ठिकाणी मुलाखती देत आहेत. नुकतेच जितेंद्रने राजश्री मराठीला मुलाखत दिली. यावेळी त्यानं आईला आई म्हणत नाही तर आबा म्हणतो, असे सांगितलं. 

मुलाखतीत तो म्हणाला, 'माझी आई माझी आईपण आहे आणि बापपण. मी तिला आबा म्हणतो, आई आणि बाप दोन्ही तिच आहे. तिच्यासारखी दुसरी बाई मी पाहिली नाही. खूप सुंदर बाई आहे. प्रत्येकाला आपली आई आवडते. मलाही माझी आई आवडते. मी तिच्याशी भांडतोही आणि प्रेमही करतो. पण ती आता हळू हळू म्हातारी होत आहे. मला काळजी वाटते तिची. माझी आई ही खमकी आणि स्वावलंबी बाई आहे. स्वत:च्या पायावर उभी राहिली. ती खूप भावनिक असून तिच्यातील तो भावनिक गुण माझ्यात आला आहे'.

जितेंद्रच्या आईचं नाव शकुंतला जोशी आहे. आईवर त्याचा प्रचंड जीव आहे. एवढेच काय तर तो आपल्या नावापुढे आईचं नाव लावतो. जितेंद्र शकुंतला जोशी.. असं नाव तो कायम लिहीत असतो. यावरून त्याचं आईशी असलेलं बाँडिंग दिसून येतं. जितेंद्र जोशीच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर काही महिन्यांपूर्वीच त्याचा गोदावरी चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. आता लवकरच त्याचा नाळ चित्रपट येत आहे. नाळ सिनेमाच्या पहिल्या भागाला प्रेक्षकांचा उत्सफुर्द प्रतिसाद लाभला. आता 'नाळ २' येत्या १० नोव्हेंबरला प्रदर्शित होत आहे.

टॅग्स :जितेंद्र जोशीमराठी अभिनेतासेलिब्रिटी