Join us

जितेंद्र जोशी नव्या इनिंगसाठी सज्ज, अभिनयानंतर या क्षेत्रात केले पदार्पण

By तेजल गावडे | Updated: September 22, 2020 18:26 IST

आता जितेंद्र जोशी नविन इनिंग खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. याबद्दल त्याने सोशल मीडियावर सांगितले आहे.

चित्रपट, छोटा पडदा आणि रंगभूमीवर आपल्या अभिनयाने अभिनेता जितेंद्र जोशीने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे. दमदार अभिनेता अशी त्याची ओळख निर्माण झाली आहे. दुनियादारीमधील साई असो किंवा मग तुकाराम चित्रपटातील संत तुकारामांची आव्हानात्मक भूमिका, प्रत्येक भूमिकेला जितेंद्र जोशी तितक्याच सहजसुंदर अभिनयाने न्याय देतो. आता जितेंद्र जोशी नविन इनिंग खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. अभिनयानंतर जितेंद्र जोशी निर्मिती क्षेत्रात पदार्पण करतो आहे. ही माहिती खुद्द त्यानेच सोशल मीडियावर दिली आहे.

जितेंद्र जोशी गोदावरी चित्रपटाची निर्मिती करत असून या चित्रपटात तो अभिनयदेखील करताना दिसणार आहे. या चित्रपटाचा पोस्टर शेअर करत त्याने लिहिले की, २ डिसेंबर, १९९७ रोजी काही स्वप्नं घेऊन मी मुंबई मध्ये दाखल झालो. गेल्या २३ वर्षात मला या शहराने आणि इथल्या माणसांनी भरभरून प्रेम दिले. शहाणं केलं. आज एक पाऊल पुढे टाकत मी माझ्या मित्रांसोबत आमचा पहिला चित्रपट निर्माण करायचं धाडस करतोय. तुमचे आशीर्वाद सदैव पाठीशी असू देत.

जितेंद्र जोशीच्या नविन इनिंगसाठी त्याचे सिनेइंडस्ट्रीतील मित्रमंडळी आणि सहकलाकार शुभेच्छा देत आहेत.

गोदावरी चित्रपटात जितेंद्र जोशीसोबत नीना कुलकर्णी, प्रियदर्शन जाधव, गौरी नलावडे, सखी गोखलेसंजय मोने मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन निखिल महाजन करणार आहे. या चित्रपटाच्या कथानकाबद्दल अद्याप काहीही समजू शकलेले नाही. 

सेक्रेड गेम्स या वेबसीरिजच्या पहिल्या सीझनमध्ये काटेकरची भूमिका जितेंद्र जोशीने साकारली होती. या भूमिकेतून त्याला चांगलीच प्रसिद्धी मिळाली.

टॅग्स :जितेंद्र जोशीसखी गोखलेसंजय मोने