Join us

​'आयत्या घरात घरोबा' चित्रपटातील कानन आता दिसते अशी!, तिचा नवरादेखील आहे हिंदीतला प्रसिद्ध अभिनेता

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 6:00 AM

सचिन पिळगांवकर (Sachin Pilgaonkar) दिग्दर्शित 'आयत्या घरात घरोबा' (Aaytya Gharat Gharoba) हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. या चित्रपटातील सर्व व्यक्तिरेखा आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून कायम आहेत.

सचिन पिळगांवकर (Sachin Pilgaonkar) दिग्दर्शित 'आयत्या घरात घरोबा' (Aaytya Gharat Gharoba Movie) हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. ​गोपूकाकांची भूमिका ​अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) यांनी ​साकारली होती. या चित्रपटात त्यांच्यासोबत ​​लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde), ​​प्रशांत दामले (Prashant Damle)​,​ सुप्रिया (Supriya Pilgaonkar), सचिन पिळ​गांवकर​(Sachin Pilgaonkar), किशोरी शहाणे(Kishori Shahane), राजेश्वरी सचदेव(Rajeshwari Sachdev), सुधीर जोशी(Sudhir Joshi), जयराम कुलकर्णी (Jayram Kulkarni) हे कलाकार प्रमुख भूमिकेत होते. या चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या नायिकेची भूमिका निभावणाऱ्या अभिनेत्रीबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊयात​.

आयत्या घरात घरोबा या चित्रपटातून सचिनची बहीण आणि लक्ष्मीकांत बेर्डेची नायिका अर्थात काननची भूमिका साकारली होती अभिनेत्री राजेश्वरी सचदेव(Rajeshwari Sachdev)ने. राजेश्वरी सचदेव ही थिएटर आर्टिस्ट, गायिका तसेच नृत्यांगना म्हणूनही ओळखली ​जाते. मुंबईत एका पंजाबी कुटुंबात जन्मलेल्या राजश्रीने IPTA​ जॉईन केले​, ​अनेक नाटकांतून तीने ​अष्टपैलू भूमिका साकारल्या. आयत्या घरात घरोबा हा तिने साकारलेला पहिला वहिला मराठी चित्रपट होता. या चित्रपटानंतर श्याम बेनेगल यांनी सुरज का सांतवा घोडा चित्रपटात तिला काम दिले. सरदारी बेगम, हरी भरी, द फरगॉटन हिरो, वेलकम तू सज्जनपूर अशा बॉलिवूड चित्रपटातून तिला संधी मिळाली.

हुल्ले हुल्लारे… हे तिने गायलेले गाणे खूपच लोकप्रिय झाले होते. राजश्रीला खरी ओळख मिळाली ती झी टीव्ही वरील अंताक्षरीच्या शोमुळे. या शोचे सूत्रसंचालन राजेश्वरी आणि अनु कपूर यांनी केले होते. याच शोमुळे तिला तिच्या आयुष्याचा जोडीदार देखील मिळाला होता. अभिनेता वरूण वडोला याने अंतक्षरीच्या शोमध्ये ​सहभाग घेतला होता. तिथेच राजेश्वरीशी त्याची चांगली ओळख झाली.

वरुण वडोला हा हिंदी मालिकेतील प्रसिद्ध अभिनेता आहे. ये है मुंबई मेरी जान​,​ कोशीश एक आशा, सोनी महिवाल, अस्तित्व एक प्रेम कहाणी अशा अनेक दर्जेदार मालिकेतून कधी विनोदी भूमिका तर कधी ​गंभीर भूमिका त्याने केल्या आहेत. २००४ साली राजेश्वरी वरूण सोबत विवाहबद्ध झाली. त्यांना देवाज्ञ नावाचा एकुलता एक मुलगा आहे. २०१८ साली राजेश्वरी पुन्हा एकदा मराठी सिनेइंडस्ट्रीकडे वळली. एक सांगायचंय या मराठी चित्रपटात तिने काम केले. यात तिच्यासोबत  के के मेनन आणि राजेश्वरी या चित्रपटात प्रमुख भूमिकेत पाहायला मिळाले होते.

टॅग्स :लक्ष्मीकांत बेर्डेअशोक सराफसचिन पिळगांवकरसुप्रिया पिळगांवकर