Join us

ब्रिटीश हवे होते अजून काही वर्ष...; वाचा,  दिग्दर्शक केदार शिंदे असे का म्हणाले?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2021 11:44 AM

केदार शिंदेंची ही पोस्ट सध्या तुफान व्हायरल होतेय. त्यांच्या फेसबुक पोस्टवर लोकांनी भरभरून कमेंटस केल्या आहेत.

ठळक मुद्देअगं बाई अरेच्चा, जत्रा, यंदा कर्तव्य आहे,  गलगले निघाले, बकुळा नामदेव घोटाळे,  इरादा पक्का  अशा विविध मराठी सिनेमातून केदार शिंदे यांनी दिग्दर्शक म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. 

कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. ऑक्सिजनचा तुटवडा आहे, रूग्णालयातील बेड्स अपुरे आहेत. अशात लोकांचे जीव धोक्यात आले आहेत. सगळेच हवालदिल आहेत. या पार्श्वभूमीवर मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) यांची एक पोस्ट सध्या व्हायरल होतेय. ब्रिटीश हवे होते अजून काही वर्ष..., असे म्हणत त्यांनी कोरोना महामारीच्या काळात राजकर्त्यांच्या ‘नाकर्तेपणा’वर नेमके बोट ठेवले आहे. (Kedar Shinde facebook post viral on social media amid corona pandemic)‘भविष्यात वीज/गॅसप्रमाणे ऑक्सिजन वापराचं बील आलं तर आश्चर्य वाटायला नको... स्वातंत्र्य म्हणजे मोकळा श्वास पण, दुर्देवाने आपल्या सगळ्याच राजकर्त्यांनी तो मोकळा श्वास सुद्धा आपल्याला सहजासहजी उपलब्ध करून दिला नाही/ ब्रिटीश हवे होते अजून काही वर्ष. आता ते हवे होते म्हणजे... किमान या जगण्याच्या महत्त्वाच्या सोई तरी व्यवस्थित करून दिल्या असत्या..,’ अशी उद्गिग्न पोस्ट केदार शिंदे यांनी केली आहे.

केदार शिंदेंची ही पोस्ट सध्या तुफान व्हायरल होतेय. त्यांच्या फेसबुक पोस्टवर लोकांनी भरभरून कमेंटस केल्या आहेत. एकदम बरोबर, 100 टक्के ब्रिटीश हवे होते, असे एका युजरने त्यांच्या या पोस्टवर लिहिले आहे. 

आपल्याकडे कुठलीही गोष्ट राजकारण केल्याशिवाय पुढे जात नाही, मग ती कितीही गंभीर असो, अशी प्रतिक्रिया एका युजरने दिली आहे. अन्य एका युजरनेही अशीच तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. ‘20-25 वर्ष नियमित टॅक्स भरून जर गरजेच्या वेळी बेड मिळत नसेल तर त्या व्यक्तिचा मृत्यू म्हणजे सरकारी खून नव्हे का? लोक व्यवस्था उभी करण्यासाठी तुम्हाला पैसे देत असतात, राजकारण करण्यासाठी नाही,’ असे या युजरने लिहिले आहे.अगं बाई अरेच्चा, जत्रा, यंदा कर्तव्य आहे,  गलगले निघाले, बकुळा नामदेव घोटाळे,  इरादा पक्का  अशा विविध मराठी सिनेमातून केदार शिंदे यांनी दिग्दर्शक म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. 

याशिवाय रंगभूमीवरही केदार यांनी दर्जेदार नाटकं दिली आहेत.  यांत सही रे सही ,  लोचा झाला रे, श्रीमंत दामोदरपंत अशा अनेक नाटकांचा उल्लेख करता येईल. याशिवाय हसा चकट फू, श्रीयुत गंगाधर टिपरे, घडलंय बिघडलंय या मालिकांमधून त्यांनी छोट्या पडद्यावरही ओळख निर्माण केली आहे.

टॅग्स :केदार शिंदे