निकाल धक्कादायक! आरक्षण नाही, भाषेला अभिजात दर्जा नाही.., म्हणत केदार शिंदेंनी व्यक्त केला संताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 05:06 PM2021-05-05T17:06:51+5:302021-05-05T17:10:16+5:30
दिग्दर्शक केदार शिंदे यांनी या निकालानंतर केलेले ट्वीट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे.
राज्यातील अतिशय संवेदनशील राजकीय आणि सामाजिक मुद्दा असलेल्या मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निकाल दिला आहे. राज्य सरकारने तयार केलेला मराठा आरक्षणाचा कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आहे. या निकालानंतर अनेकजण सोशल मीडियाद्वारे आपली मतं व्यक्त करत आहेत.
दिग्दर्शक केदार शिंदे यांनी या निकालानंतर केलेले ट्वीट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे. त्यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये लिहिले आहे की, आजचा #मराठा_आरक्षणाबद्दल #supremecourtofindia चा निकाल धक्कादायक! आरक्षण नाही, भाषेला अभिजात दर्जा नाही, मायभूमीत म्हणावा तसा टक्का नाही!
केदार शिंदे यांचे मत अगदी योग्य असल्याचे अनेक नेटिझन्स त्यांना कमेंटच्या माध्यमातून सांगत आहेत.
आजचा #मराठा_आरक्षण बद्दल #supremecourtofindia चा निकाल धक्कादायक! आरक्षण नाही, भाषेला अभिजात दर्जा नाही, मायभूमीत म्हणावा तसा टक्का नाही!!!!
— Kedar Shindde (@mekedarshinde) May 5, 2021
मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाला आव्हान देणाऱ्या मराठा आरक्षणाच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला. मराठा समाजाला शैक्षणिक आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्याबाबत न्यायालय काय निर्णय देणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं होतं. गायकवाड समितीचा अहवाल स्वीकारार्ह नाही असं म्हणत न्यायालयाने समितीच्या शिफारसी फेटाळून लावल्या. मात्र मराठा आरक्षण कायद्याच्या माध्यमातून ९ सप्टेंबर २०२० पर्यंत झालेले वैद्यकीय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाचे प्रवेश रद्द होणार नाहीत, असा काहीसा दिलासा न्यायालयाने दिला. राज्य सरकारने केलेला मराठा आरक्षणाचा कायदा घटनाबाह्य असल्याचे न्यायमूर्तींनी सुनावणीदरम्यान म्हटलं.