Join us

केदार शिंदे सांगतायेत, मराठी मुलांना हीच संधी आहे...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2020 2:38 PM

मजूर आपापल्या गावी परतत असल्याच्या अनुषंगाने केदार शिंदेने ही पोस्ट केली आहे.

ठळक मुद्देकेदार शिंदे यांनी फेसबुकला एक पोस्ट करून त्यात लिहिले आहे की, आता सर्व नोंदणी करून आपआपल्या गावाचा मार्ग धरतायत. @CMOMaharashtra आपल्याकडे त्यांचा data उपलब्ध झालाय. मराठी तरूणांना ते करत असलेल्या कामांची माहिती करून द्यावी!

कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असून आता भारतातही कोरोना व्हायरस पसरायला सुरुवात झाली आहे. या व्हायरसमुळे भारतात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तसेच भारतात लॉकडाऊन असल्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. देशातील मजुरांचे अतिशय हाल होत असल्याने त्यांनी आपापल्या गावी जाण्याची मागणी केली होती आणि आता देशातील विविध ठिकाणी असणाऱ्या मजुरांना खास रेल्वेने त्यांच्या गावी पाठवले जात आहे. गावी पाठवत असताना त्यांच्याकडून त्यांची संपूर्ण माहिती घेतली जात आहे. याच आधारावर आता मराठीतील प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली असून ही पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे.

केदार शिंदे यांनी फेसबुकला एक पोस्ट करून त्यात लिहिले आहे की, आता सर्व नोंदणी करून आपआपल्या गावाचा मार्ग धरतायत. @CMOMaharashtra आपल्याकडे त्यांचा data उपलब्ध झालाय. मराठी तरूणांना ते करत असलेल्या कामांची माहिती करून द्यावी! मराठी तरुणांना हीच संधी आहे. नंतर गळे काढून रडू नका... त्यांनी कामं हिसकावली!

परराज्यातील मजुरांमुळे महाराष्ट्रातील स्थानिकांना कामं मिळत नाही असे नेहमीच म्हटले जाते. पण आता ते त्यांच्या राज्यात परतल्यानंतर मराठी मुलांना त्यांची कामं मिळण्याची एक खूप चांगली संधी उपलब्ध असल्याचे केदार शिंदे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले असून त्यांची ही पोस्ट लोकांना प्रचंड आवडत आहे.

केदार शिंदे यांनी योग्य मत मांडले असून मराठी मुलांनी या संधीचा वापर करून घेणे गरजेचे असल्याचे लोक देखील कमेंटद्वारे सांगत आहेत.  

टॅग्स :केदार शिंदे