Join us

केतकी माटेगावकरशी लग्न करायचंय तर 'हा' गुण हवाच, भावी जोडीदाराबद्दल म्हणाली....

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2024 18:20 IST

आयुष्याचा जोडीदार म्हणून कसा मुलगा हवा, याबाबत केतकीनं खुलासा केला आहे.

उत्तम आवाजासह अभिनयामुळे चर्चेत येणारी गायिका, अभिनेत्री म्हणजे केतकी माटेगावकर.  आजवर अनेक गाण्यांच्या माध्यमातून केतकीने श्रोत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. लोभसवाणा चेहरा आणि स्मित हास्यामुळे केतकी चाहत्यांचे लक्ष वेधून घेते.त्यामुळे सहाजिकच तिचा चाहतावर्ग सुद्धा तितकाच मोठा आहे. यात अनेक जण केतकीच्या लव्हलाइफविषयी किंवा तिच्या लग्नाविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. यामध्येच आयुष्याचा जोडीदार म्हणून कसा मुलगा हवा, याबाबत केतकीनं खुलासा केला आहे.

केतकीनं नुकतेच 'मराठी किडा' या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. यावेळी केतकीनं आयुष्याचा जोडीदारावर भाष्य केलं. मुलामध्ये प्रामाणिकपणा हा गुण असावा, अशी अपेक्षा केतकीनं व्यक्त केली. ती म्हणाली, 'मला माझ्या जोडीदारामध्ये एकच गुण हवा आहे. तो म्हणजे प्रामाणिकपणा'. यासोबतच तिनं ती सिंगल असल्याचही सांगितलं.

केतकी सोशल मीडियावरदेखील सक्रिय असते. या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात राहत असते.  केतकी माटेगावकर हिला चाहते नेहमीच तिच्या जोडीदाराबद्दल, रिलेशनशिपबद्दल प्रश्न विचारताना दिसतात. पण, केतकी आपलं  खाजगी आयुष्य प्रसिद्धीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे केतकीच्या आयुष्यातील खास व्यक्ती कोण आहे. हे अद्याप कळू शकलेलं नाही. याआधीही तिनं आपलं लग्न झालं असून माझा नवरा हे माझं म्युझिक असल्याचं म्हटलं होतं.

टॅग्स :केतकी माटेगावकरसेलिब्रिटीमराठी अभिनेतासोशल मीडियालग्न