'काजळली रात खुळी, बेहेकला जमाना' असे धमाल शब्द असलेलं 'खिचिक झालं पोट्ट्याले' हे 'खिचिक' या चित्रपटातील गाणं यूट्यूबवर अल्पावधीतच ट्रेंडिंग झालं आहे. श्रुतिका लोंढेवर चित्रीत झालेल्या या गाण्याचे एका दिवसातच तीन लाख व्ह्यूज झाले असून, या गाण्यावर भरभरून प्रतिक्रिया येत आहेत.
कांतानंद प्रॉडक्शन्सच्या सचिन अनिल धकाते यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. पराग जांभुळे, अमितकुमार बिडला चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. प्रीतम एसके पाटील यांनी या चित्रपटाचं लेखन दिग्दर्शन केलं आहे. योगेश कोळीनं छायांकन, अमित मलकानी आणि रोहन पाटीलनं संकलन, नितीन बोरकरनं कला दिग्दर्शन, विजय गवंडेनं पार्श्वसंगीत केलं आहे. चित्रपटात सिद्धार्थ जाधव, प्रथमेश परब, पॉला मॅक्ग्लिन, सुदेश बेरी, अनिल धकाते, रसिका चव्हाण, शिल्पा ठाकरे, यश खोंड यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सचिन दुबाले पाटील हे या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत
आदर्श शिंदे आणि श्रुती जकाती यांनी हे गाणं गायलं आहे, तर दत्ता गुंजाळ यांच्या शब्दांना अभिषेक-दत्ता यांनी संगीतबद्ध केलं आहे. अभिषेक काटेनं संगीत संयोजन केलं आहे. १९ ऑगस्टला प्रदर्शित केलेल्या या गाण्यानं एका दिवसातच तीन लाखांचा टप्पा गाठला आहे.