Join us

Video : धोतर अन् टोपी घालून अभिनेत्याचा 'चला जेजुरीला जाऊ'वर डान्स; किशोरी शहाणेही थिरकल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2023 16:52 IST

'चला जेजुरीला जाऊ' गाण्यावर थिरकल्या किशोरी शहाणे, व्हिडिओ व्हायरल

प्रसिद्ध अभिनेत्री किशोरी शहाणेंनी अनेक सुपरहिट मराठी चित्रपटांतून मनोरंजन करत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. मराठीबरोबरच त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतही जम बसवला. प्यार का देवता, रेड : द डार्क साईड, सुपरस्टार, बॉम्ब ब्लास्ट अशा हिंदी चित्रपटांतून त्यांनी अभिनयाची छाप पाडली. अभिनयाबरोबर किशोरी शहाणे त्यांच्या नृत्यासाठी ओळखल्या जातात. पछाडलेला चित्रपटातील त्यांची 'चला जेजुरीला जाऊ' ही लावणी लोकप्रिय ठरली होती. 

एका इव्हेंटदरम्यान किशोरी शहाणे या लावणीवर थिरकताना दिसल्या. 'घर बंदूक बिरयानी' या चित्रपटात काम केलेला अभिनेता विक्रम अल्हाटने 'चला जेजुरीला जाऊ' गाण्यावर ठेका धरला. या गाण्यावर डान्स करण्याचा मोह किशोरी शहाणेंना आवरता आला नाही. विक्रमबरोबर किशोरी शहाणेंनीही चला जेजुरीला जाऊ या लावणीवर ठेका धरला. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 

किशोरी शहाणेंनी चित्रपटांसह अनेक गाजलेल्या मालिकांमध्येही काम केलं आहे. सध्या त्या 'गुम है किसी के प्यार मे' या हिंदी मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. किशोरी शहाणे 'बिग बॉस मराठी'च्या दुसऱ्या पर्वातही सहभागी झाल्या होत्या. 'बिग बॉस'मुळे त्या प्रसिद्धीझोतात आल्या होत्या.  

टॅग्स :किशोरी शहाणेमराठी अभिनेतामराठी चित्रपट