Join us

नाकावरच्या रागाला औषध काय... या गाण्यातील छकुली आठवतेय ना? आता पाहा दिसते कशी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2021 3:59 PM

‘कळत नकळत’ हा सिनेमा आठवला की, या सिनेमातील एक गाणं हमखास आठवतं. होय, नाकावरच्या रागाला औषध काय? गालावरच्या फुग्ग्यांचं म्हणणं तरी काय? हेच ते गाणं.

ठळक मुद्देएक बालकलाकार म्हणून मृण्मयीने कळत नकळत चित्रपटात काम केले होते. परंतु पुढे मात्र ती कधी कोणत्या चित्रपटात पाहिली गेली नाही.

‘कळत नकळत’ (Kalat Nakalat) हा सिनेमा आठवला की, या सिनेमातील एक गाणं हमखास आठवतं. होय,  नाकावरच्या रागाला औषध काय? गालावरच्या फुग्ग्यांचं म्हणणं तरी काय? ( Nakavarchya Ragala Aushadh Kay ) हेच ते गाणं.   विक्रम गोखले, सविता प्रभुणे, अश्विनी भावे आणि अशोक सराफ (Ashok Saraf) यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘कळत नकळत’ हा सिनेमा 1989 साली प्रदर्शित झाला होता. या सिनेमातील  नाकावरच्या रागाला औषध काय? हे गाणं चांगलंच लोकप्रिय झालं होतं.  अशोक सराफ आपल्या रुसलेल्या भाचीला म्हणजेच छकुलीला समजावताना  या गाण्यात दिसतात. या गाण्यातील चिमुकली छकुली आता कशी दिसत असेन? असा प्रश्न तुम्हाला कधी पडला असेलच तर आज आम्ही तिच्याच बद्दल सांगणार आहोत.

होय, छकुलीची ही भूूमिका बालकलाकार मृण्मयी चांदोरकर (Mrunmayee Chandorkar) हिने साकारली होती. ही छकुली आता एका बरीच मोठी आहे. तिचे लग्न झाले असून एका मुलीची आई आहे. 

तिची आणखी एक ओळख तुम्हाला कदाचित ठाऊक असेलच. मृण्मयी ही  प्रसिद्ध लेखक व.पू.काळे यांची नात आहे. एक सुप्रसिद्ध लेखक, कथाकथनकार आणि कादंबरीकार म्हणून व.पू.काळे यांची  एक वेगळी ओळख आहे.

त्यातील ही वाट एकटीची, ठिकरी, साथी अशी पुस्तके खूपच प्रसिद्धी मिळवून गेली. वपुंनी लेक स्वाती चांदोरकर या सुद्धा एक प्रसिद्ध लेखिका आहेत.  एक पायरी वर, अनाहत, काळाक भिन्न, शेष, उत्खनन ही पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. मृण्मयी चांदोरकर ही स्वाती चांदोरकर यांची मुलगी आहे.

एक बालकलाकार म्हणून मृण्मयीने कळत नकळत चित्रपटात काम केले होते. परंतु पुढे मात्र ती कधी कोणत्या चित्रपटात पाहिली गेली नाही. आता ती तिच्या संसारात रमली आहे. शिवाय ती स्टार इंडियाशी निगडीत आहे.

टॅग्स :अशोक सराफ