‘सीआयडी’ या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेले एसीपी प्रद्युम्न अर्थात शिवाजी साटम (Shivaji Satam)आठवले की पाठोपाठ आठवतात ते त्यांचे दोन संवाद. ‘दया, दरवाजा तोड दो’आणि ‘कुछ तो गडबड है दया’ हे त्यांचे संवाद खूप गाजलेत. छोट्या पडद्यासोबतच मराठी व हिंदी चित्रपटांमध्येही त्यांनी भरपूर काम केले. पण आज आम्ही शिवाजी साटम यांच्याबद्दल नाही तर त्यांचा मुलगा आणि सूनेबद्दल सांगणार आहोत. शिवाजी साटम यांचा मुलगा व सून दोघेही अभिनय क्षेत्रात आहेत आणि दोघेही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध चेहरे आहेत. शिवाजी साटम यांच्या मुलाचे नाव अभिजीत साटम ( Abhijeet Satam)आहे.
शिवाजी साटम यांना आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आणि कुटुंबाबद्दल फार बोलायला आवडत नाही. हेच कारण आहे की फारच थोड्या लोकांना त्यांच्या मुलाबद्दल माहिती आहे. अभिजितने ‘हापूस’ या मराठी चित्रपटात काम केले होते. याशिवाय त्याने इतर मराठी चित्रपटातदेखील काम केले आहे. तुम्हाला अभिजित हा शिवाजी साटम यांचा मुलगा आहे हे माहित असेल. परंतु, शिवाजी साटम यांच्या सुनबाईदेखील मराठी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहेत.तिचे नाव मधुरा वेलणकर (Madhura Welankar-Satam). मधुरा हीअभिनेते प्रदीप वेलणकर यांची कन्या आहे. या नात्याने प्रदीप वेलणकर व शिवाजी साटम हे दोघे नात्याने व्याही आहेत.
मधुरा व अभिजीत यांना युवान नावाचा एक मुलगा आहे. मधुरा वेलणकर सोशल मीडियामध्येही खूप सक्रिय असते आणि तिच्या चाहत्यांसाठी नेहमीच नवीन फोटो अपलोड करताना दिसते.मधुराने अखंड सौभ्याग्यवती, अधांतरी, अशाच एका बेटावर, उलाढाल, एक डाव धोबी पछाड, कॅनवास, खबरदार, गिलटी, गुमनाम है कोई (नाटक), गोजिरी, जन गण मन, नॉट ओन्ली मिसेस राऊत, पाऊलवाट, मातीच्या चुली, मी अमृता बोलतेय, मेड इन चीन, रंगीबेरंगी, सरीवर सरी, हापूस, क्षणो क्षणी आदी चित्रपटांमध्ये काम केले आहे.