Join us

धक्कादायक, श्रेयस तळपदे विरोधात पोलिसात तक्रार दाखल, कायदेशीर कारवाईची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2021 8:04 PM

माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेमुळे चर्चेत आहे. टीव्हीवर श्रेयस कमबॅक करत आहे. मालिकेतून श्रेयस जवळपास १७ वर्षांनी छोट्या पडद्यावर परतणार आहे. मालिकेचा प्रोमो पाहून रसिकही मालिकेची आतुरतेने वाट पाहत आहेत.

अभिनेता श्रेयस तळपदे सध्या 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेमुळे चर्चेत आहे. टीव्हीवर श्रेयस कमबॅक करत आहे. मालिकेतून श्रेयस जवळपास १७ वर्षांनी छोट्या पडद्यावर परतणार आहे. मालिकेचा प्रोमो पाहून रसिकही मालिकेची आतुरतेने वाट पाहत आहेत. श्रेयस तळपदे या मालिकेमुळे चर्चेत असताना आणखी एका कारणामुळे तो चर्चेत आला आहे. 

कोरोनाचा फटका मनोरंजनसृष्टीलाही बसला. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून सिनेमा, मालिकाचे शूटिंग करण्यावरही सरकाने बंदी घातली होती.  इतकेच काय तर नाट्यगृह बंद असल्यामुळे नाटकाचा एकही प्रयोग या काळात झाला नाही. मात्र कोरोना काळातही श्रेयस तळपदेने सरकारच्या नियमाचे उल्लंघन केल्याचे प्रकरण समोर आले आहे. इतकेच नाही तर व्यावसायिक नाटकाची प्रॉपर्टीचा बेकायदेशीररित्या कमर्शिअल गोष्टीसाठी वापर करण्याचाही आरोप त्याच्यावर आला आहे.

सुरेश सांवत यांनीच 'अलबत्या खलबत्या' या नाटकाचा सेट श्रेयसला कमर्शिअल शूटिंगसाठी दिला होता. नाटकं बंद असल्यामुळे अलबत्या खलबत्या या नाटकाचा सेट असाच पडून होता. श्रेयस तळपदेच्या ओटीटी प्लॅटफॉर्मच्या भक्षक प्रोजेक्टसाठी हा सेट वापरण्यात आला. मुळात या नाटकाचा सेट वापरण्यासाठी अव्दैत थिएटर या नाट्यसंस्थेचे निर्माते राहुल भंडारे यांची परवानगी घेणे गरजेचे होते. तसेच राहुल भंडारे यांना सुरेश सांवत यांनी चुकीची माहिती देत हा सेट गोडाऊन मधून काढून श्रेयस तळपदेला देण्यात आला. 

मात्र राहुल भंडारे यांना याविषयी कोणत्याही प्रकारची पूर्वकल्पना सुरेश सांवतने दिली नाही. त्यामुळे आता हे प्रकरण श्रेयस तळपदेच्या चांगलेच अंगाशी येण्याची शक्यता आहे. बेकायदेशीरित्या या नाटकाचा सेट कमर्शिअल कारणासाठी वापरण्यात आल्याने Intellectual Property Rights अंतर्गत श्रेयस तळपदे आणि सुरेश सावंत यांच्यावर कायदेशीर कारवाईसाठी राहुल भंडारे यांच्याकडून याबाबतचे अर्ज शिवडी पोलिस स्थानकात देण्यात आला आहे. त्यामुळे श्रेयस तळपदे आणि सुरेश सावंत यांच्यावर कायदेशी कारवाईही केली जाणार असल्याची शक्यता आहे.   

टॅग्स :श्रेयस तळपदे