Join us

कोल्हापूरचं नाव ‘कलापूर’ करा;  सचिन पिळगावकर यांची मागणी, सांगितलं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2021 4:13 PM

कोल्हापूरचं नाव पुन्हा एकदा कलापूर व्हावं, अशी माझी इच्छा आहे. यासाठी आपण प्रयत्न करत राहणार, असं सचिन पिळगावकर म्हणाले.

ठळक मुद्देप्रेक्षक जेवढे दक्ष होतील तेवढी कलाकृती बनवणारी माणसं आपले टूल्स बदलतील. आता काहीही करून उपयोगाचे नाही कारण प्रेक्षक लगेच पकडतात, असंही ते म्हणाले. 

कोल्हापूरचे नाव ‘कलापूर’ करा, अशी आग्रही मागणी मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर (Sachin Pilgaonkar) यांनी पुढे रेटली आहे. हे खास नामांतर करण्यामागचं कारणही त्यांनी सांगितलं आहे.‘माझा महाराष्ट्र, माझा व्हिजन’ या कार्यक्रमात सचिन यांनी ही मागणी केली. ते म्हणाले, कोल्हापूर हे त्या जागेचं नाव कधीच नव्हतं. ते कलेचं माहेरघर होतं. तिथं चित्रपटसृष्टी होती, सर्व प्रकारचे कलाकार होते. म्हणून त्याचं नाव कलापूर होतं. इंग्रजांनी कलापूरचं कोल्हापूूर केलं. त्यामुळे कोल्हापूरचं नाव पुन्हा एकदा कलापूर व्हावं, अशी माझी इच्छा आहे. यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचंही ते म्हणाले.

आधीसारखी मजा नाही...आज सिनेमात अनेक बदल झाले आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञान आलं आहे. डिजिटलायझेनही झालं आहे. पण आधीसारखी मजा नाही. अर्थात मला बदल मान्य नाहीत, असं नाही. मी अजूनही शिकतो आहे, असंही ते म्हणाले,

माझ्यात आणि महेश कोठारेंमध्ये स्पर्धा होती...माझ्यावर शहरी संस्कार झाले होते. त्यामुळे माझी विचार करण्याची पद्धतही शहरी होती. माझ्या सिनेमांतही याची झलक दिसते. गावातील चित्रपट मी शहरात आणले. हा खूप मोठा बदल होता. माझ्यानंतर महेश कोठारे याने अनेक नवे प्रयोग केलेत. आमच्यात एक प्रकारची स्पर्धा होती. महाराष्ट्रात सिनेसृष्टीत नवं तंत्रज्ञान आणण्याचं श्रेय मी त्यालाच देईल, असंही ते म्हणाले.

आजचा प्रेक्षक खूप दक्षआज प्रेक्षक खुप दक्ष झाले आहेत. प्रेक्षक जेवढे दक्ष होतील तेवढी कलाकृती बनवणारी माणसं आपले टूल्स बदलतील. आता काहीही करून उपयोगाचे नाही कारण प्रेक्षक लगेच पकडतात, असंही ते म्हणाले. 

टॅग्स :सचिन पिळगांवकरकोल्हापूर