Join us

कॅन्सर रुग्णांसाठी क्रांती रेडकर आणि समीर वानखेडे यांचा पुढाकार; व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले…

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2024 2:24 PM

 क्रांती रेडकरनं सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला.

कॅन्सर अर्थात कर्करोग (Cancer) हा गंभीर आणि जीवघेणा आजार आहे. कर्करोगाविषयी जनजागृती करण्याकरिता ४ फेब्रुवारी हा दिवस जागतिक कर्करोग दिवस म्हणून साजरा केला जातो. यासाठी अभिनेते आणि दिग्गज व्यक्ती पुढाकार घेत कॅन्सर रुग्णाला शक्य तितकी मदत करतात. असेच कौतुकास्पदा काम  अभिनेत्री क्रांती रेडकर आणि समीर वानखेडे यांनी केलं आहे. त्यांनी  जागतिक कर्करोग दिनी कर्करोगावर उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या मदत करत समाजकार्याला हातभार लावला. 

 क्रांती रेडकरनं सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला. व्हिडीओला दिलेल्या कॅप्शनमध्ये क्रांतीने लिहलं, 'जागतिक कर्करोग दिनानिमित्त सत्यार्थी फाउंडेशनमध्ये काही कर्करोग रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची सेवा करण्याचा आशीर्वाद आम्हाला मिळाला. या प्राणघातक आजाराने प्रभावित झालेल्या अनेक लोकांचे आणि कुटुंबांचे सर्व दु:ख दूर करावे हीच देवाकडे पार्थना. जगभरातील सर्व कर्करोग रुग्णांना लवकरात लवकर बरे होण्यासाठी माझ्या शुभेच्छा आणि प्रार्थना'. 

सत्यार्थी फाउंडेशनमध्ये क्रांती आणि समीर वानखेडे यांनी कर्करोग्यांची सेवा केली. त्यांच्याशी सवांद साधला आणि अन्नदान केलं. क्रांतीनं शेअर केलेल्या या व्हिडीओवर चाहत्यांनी लाईक्स आणि कौतुकाचा वर्षाव केला आहे. एकाने लिहलं, 'करोडो दान मंदिरात करण्यापेक्षा कोणाचं पोट भरण जास्त पुण्याचं काम असत. खूप छान तुम्हा दोघांना पण'. तर एका व्यक्तीने लिहलं, 'ताई खूप सुंदर मस्त'. 'दान परीमिता सर्वात श्रेष्ठ' आणि 'खूप छान' अशा कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत. 

क्रांती रेडकर ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. अभिनय कौशल्यामुळे चर्चेत असणारी क्रांती सध्या तिच्या वैयक्तिक जीवनामुळे जास्त चर्चेत असते. क्रांतीने २०१७ मध्ये एनसीबीचे डॅशिंग अधिकारी समीर वानखेडे यांच्याशी लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली.  क्रांती आणि समीर यांना जुळ्या मुली आहेत. क्रांती अनेकदा समीर यांच्याबरोबरचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

टॅग्स :क्रांती रेडकरसेलिब्रिटीमराठीमराठी अभिनेतामराठी चित्रपटसमीर वानखेडेकर्करोगकॅन्सर जनजागृती