Join us

क्रांती रेडकरच्या जुळ्या मुलींना सांभाळते ही व्यक्ती, क्रांतीने मानले आभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2019 18:50 IST

अभिनेत्री क्रांती रेडकरने ३ डिसेंबरला जुळ्या मुलींना जन्म दिला.

'कोंबडी पळाली...' या गाण्यातून घराघरात पोहचलेली अभिनेत्री क्रांती रेडकरने ३ डिसेंबरला जुळ्या मुलींना जन्म दिला. या मुलींना सांभाळण्यासाठी क्रांतीने केअर टेकर ठेवली आहे. जिचे आभार नुकतेच क्रांतीने सोशल मीडियावर फोटो शेअर करून मानले आहे.

क्रांतीने सोशल मी़डियावर केअर टेकरसोबतचा फोटो शेअर करीत लिहिले की, मी आणि माझ्या मुलींची सांभाळ करणारी केअर टेकर. ती दररोज माझ्या मुलींची जेवढी काळजी घेते त्यासाठी मी तिचे आभार मानेन तेवढे कमीच आहे. तिची खूपच मदत होते. तिच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होवोत व ती नेहमी आनंदी राहो, ही सदिच्छा. सध्या ती माझी फोटोग्राफरही झाली आहे. 

क्रांतीने पुढे लिहिले की, मला दोन मुले आहेत. त्यामुळे आणखीन एक केअर टेकर आहे. जिचा यात फोटो नाही.तिचाही फोटो लवकरच शेअर करेन. माझे या मुलींवर प्रेम आहे. पैसे मदत विकत घेऊ शकतात पण प्रेम नाही. या दोघी माझ्या मुलींची खूप प्रेमाने काळजी घेतात.

क्रांतीने मार्च २०१७मध्ये आयपीएस अधिकारी समीर वानखेडेसोबत लग्न केले. 'जत्रा' सिनेमातील ‘कोंबडी पळाली’ या गाण्यामुळे क्रांतीला प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्यानंतर तिनं 'ऑन ड्युटी 24 तास', 'माझा नवरा तुझी बायको', 'नो एन्ट्री पुढे धोका आहे'  यांसारख्या सिनेमात अभिनयाची जादू दाखवली. अभिनयासह तिने दिग्दर्शिका आणि निर्माती म्हणून नवी इनिंग सुरू केली आहे.

तिने 'काकण' या सिनेमाचे दिग्दर्शनही केले होते. गेल्या महिन्यात तिचा रॉकी चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर हवा तितका चांगला प्रतिसाद मिळाला नाही.

टॅग्स :क्रांती रेडकर