क्रांती रेडकर ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. अभिनय कौशल्यामुळे चर्चेत येणारी क्रांती सध्या तिच्या वैयक्तिक जीवनामुळे जास्त चर्चेत असते. क्रांतीने २०१७ मध्ये एनसीबीचे डॅशिंग अधिकारी समीर वानखेडे यांच्याशी लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली. क्रांती आणि समीर यांना जुळ्या मुली आहेत. क्रांती अनेकदा समीर यांच्याबरोबरचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. यातच क्रांतीने व्हिडीओ शेअर करत पती समीर वानखेडेंच्या वाढदिवसाची खास झलक दाखवली.
एखाद्या महागड्या रेस्टॉरंटमध्ये किंवा हॉलिडे डेस्टिनेशनवर जाऊन क्रांतीने समीर वानखेडेंचा वाढदिवस साजरा केला नाही, तर एका खास ठिकाणी वाढदिवस साजरा करण्यासाठी दोघेही पोहोचले होते. अभिनेत्रीने व्हिडीओ आणि लांबलचक पोस्ट शेअर करत स्पेशल बर्थडेविषयी सांगितले.
समीर आणि क्रांती हे वाढदिवसानिमित्त मुंबईतील एका आश्रमात पोहचले होते. आश्रमात मुलांना विविध प्रकारच्या भेटवस्तू देऊन त्यांचा आनंद द्विगुणित केला. क्रांतीने लिहिले की, ज्यांचं हृदय हे प्रेमाने भरलेले असते. ते कायम देवाच्या जवळ असल्यासारखे असतात. आज समीर यांचा वाढदिवस चिमुकल्या मुलांसोबत साजरा करत आहोत'.या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी शुभेच्छांचा वर्षाव करत क्रांती व समीर वानखेडेंचं कौतुक केलं आहे.
तर आणखी एक व्हिडीओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहले, 'मी तुमच्यापैकी प्रत्येकाला विनंती करते की तुम्ही पुढे यावे आणि अशा शाळा आणि घरांना मदत करावी. खास करून विशेष दिव्यांग मुलांना मदत करावी. त्यांच्यासोबत वेळ घालवताना तुम्हाला असहाय्य वाटते आणि त्याच वेळी कृतज्ञतेने भरलेलं वाटतं. आम्हाला त्यांच्यासाठी बरेच काही करायचं आहे. त्यांनी दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा नव्हत्या तर ते आशीर्वाद होते'. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी शुभेच्छांचा वर्षाव करत क्रांती व समीर वानखेडेंचं कौतुक केलं आहे.