Join us

लादेन आला रे आला 6 ऑक्टोबरला रसिकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2017 10:29 AM

‘तेरे बिन लादेन’ या हिंदी चित्रपटाविषयी आपल्या सर्वांना माहित आहे, आता मराठीत पण ओसामा बिन लादेन या नावावर आधारित ...

‘तेरे बिन लादेन’ या हिंदी चित्रपटाविषयी आपल्या सर्वांना माहित आहे, आता मराठीत पण ओसामा बिन लादेन या नावावर आधारित एक चित्रपट येणार आहे. या चित्रपटाचे नाव आहे ‘लादेन आला रे आला’.ब-याच दिवसापासून हा सिनेमा चर्चेत आहे.ट्रेलर रिलीज झाल्यापासून सिनेमा कसा असणार याविषयी उत्सुकता पाहायला मिळत आहे.अखेर या सिनेमाची प्रदर्शनाची तारिख जाहीर करण्यात आली आहे.इमार फिल्म्स इंटरनॅशनल युनिट 2 प्रस्तुत नझीम रिझवी यांनी दिग्दर्शित आणि निर्मित केलेला 'लादेन आला रे आला' हा बहुचर्चित सिनेमा येत्या 6 ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.'लादेन आला रे आला' या सिनेमाची निर्मिती आणि दिग्दर्शन अशी दुहेरी जबाबदारी नझीम रिझवी यांनी सांभाळली आहे. तर या सिनेमाला प्रकाश प्रभाकर आणि आकाश बॉइज यांनी संगीत दिलंय.कथा नझीम रिझवी आणि सतीश महाडेश्वर यांनी तर पटकथा नझीम रिझवी आणि आदेश अर्जुन यांनी मिळून लिहिली आहे.या सिनेमाचे डिओपी जॉनी लाल हे असून आशिष म्हात्रे आणि अपूर्वा मोतीवाले यांनी संकलन केलं आहे.अझीम हा नवोदित चेहरा या सिनेमातून बघायला मिळणार आहे. तर आरती सपकाळ, किशोर नंदलेश्वर, विजय पाटकर, कमलेश सावंत, कांचन पगारे, अतुल तोडणकर, सक्षम कुलकर्णी, अक्षदा पटेल, वृषाली हटलकर, सुनील जोशी, शिवराज वाळवेकर, कार्तिकी सूर्यवंशी, अंकुश मांडेकर, मयूर पवार, अभिलाषा यांच्याही महत्वपूर्ण भूमिका आहेत.अभिषेक शर्मा दिग्दर्शित 'तेरे बिन लादेन' या हिंदी सिनेमाचीही बरीच चर्चा झाली आहेत.त्यामुळे या सिनेमाचा सिक्वेलही बनवण्यात आला.'तेरे बिन लादेन डेड ऑर अलाइव'हा सिक्वेलही प्रदर्शित झाला होता.'तेरे बिन लादेन' हा सिनेमाचा बजेट 15 कोटी इतका होता आणि या सिनेमा तब्बल  50 कोटींचा बॉक्स ऑफिसवर गल्ला जमवला होता.'तेरे बिन लादेन डेड ऑर अलाइव'चा ही बजेट जवळपास 10-15 कोटी इतका होता.मात्र हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल करू शकला नव्हता.हिंदी लादेेनवर प्रदर्शित झालेल्या सिनेेमाने रसिकांचे फुल ऑन मनोरंजन केले होते. त्यामुळे आता मराठी प्रदर्शित होणारा लादेन आला रे आला हा सिनेमा रूपेरी पडद्यावर रसिकांचे कितपत मनोरंजन करणार याकडेच सा-यांचे लक्ष लागले आहे.