"लेथ जोशीं"चे पोस्टर लाँच!!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2018 04:05 AM2018-06-01T04:05:30+5:302018-06-01T09:35:30+5:30
आधुनिकीकरण आणि यांत्रिकीकरण यांच्या अपरिहार्य अशा घोंगावणाऱ्या वादळाने जगभरातला कामगार वर्गाला वेढलं आहे. कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. ...
आ ुनिकीकरण आणि यांत्रिकीकरण यांच्या अपरिहार्य अशा घोंगावणाऱ्या वादळाने जगभरातला कामगार वर्गाला वेढलं आहे. कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. काळाच्या ओघात कौशल्याची साधनं आणि त्याच्याशी जोडलेल्या भावनाही लोप पावतात. ही निरंतन प्रक्रिया आहे. "लेथ जोशी" या चित्रपटात लेथ या यंत्राशी जोडलेली कथा मांडण्यात आली असून १३ जुलैला हा चित्रपट आपल्या भेटीला येत आहे.
अमोल कागणे आणि लक्ष्मण कागणे यांच्या अमोल कागणे स्टुडिओजने हा चित्रपट प्रस्तुत केला असून प्रवाह निर्मिती आणि डॉन स्टुडिओज यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. मंगेश जोशी यांनी चित्रपटाचं लेखन दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटात चित्तरंजन गिरी, अश्विनी गिरी, सेवा चौहान, ओम भूतकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सत्यजित श्रीराम यांनी सिनेमॅटोग्राफी तर मकरंद डंभारे यांनी संकलन म्हणून काम पाहिले आहे. नुकतेच या चित्रपटाचे एक स्पेशल स्क्रीनिंग पुणे येथे महाराष्ट्राच्या विविध कोपऱ्यातून आलेल्या आयटी क्षेत्रातीतील मान्यवर मंडळींसाठी करण्यात आले होते, यावेळी या चित्रपटाचे पोस्टर लाँच करण्यात आले.या चित्रपटाचा विषय हा खूपच वेगळा असून मनाला भिडणारा आहे. सत्य परिस्थितीवर हा चित्रपट भाष्य करतो. यंत्र आणि माणूस यांच्यातलं नातं अधोरेखित करण्याचा हा वेगळा प्रयत्न असून प्रेक्षकांनाही हा चित्रपट नक्कीच आवडेल अशी आशा चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते अमोल कागणे यांनी व्यक्त केली.
आजच्या कम्प्युटरच्या युगात अनेक जुनी यंत्र, त्यावर काम करणारे कामगार कालबाह्य झाले आहेत. अशा काळात लेथ या यंत्राची आठवण करून देणारा, त्या यंत्राशी जोडलेल्या भावनांना उजाळा देणारी कथा लेथ जोशी या चित्रपटातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे, ' असं दिग्दर्शक मंगेश जोशी यांनी सांगितलं. या चित्रपटाने जगभर १२ आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवले असून, २० आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या चित्रपटाची निवड झाली आहे.