Join us

लता मंगेशकर आणि अाशा भोसले यांच्या गाण्यावर आधारित सावनी रवींद्र सादर करणार लताशा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2018 7:40 AM

‘होणार सून मी या घरची’ मालिकेतील "तू मला, मी तुला…” या अत्यंत लोकप्रिय गाण्यामुळे घराघरात पोहोचलेली गुणी गायिका सावनी ...

‘होणार सून मी या घरची’ मालिकेतील "तू मला, मी तुला…” या अत्यंत लोकप्रिय गाण्यामुळे घराघरात पोहोचलेली गुणी गायिका सावनी रवींद्र नेहमीच आपल्या चाहत्यांसाठी काहीतरी खास आणण्याच्या प्रयत्नात असते. यावेळी सुद्धा सावनी आपल्या चाहत्यांना एक संगीतमय भेट देणार आहे. ती घेऊन येतेय, आपल्या लाडक्या लता दीदी आणि अाशा ताई, अर्थात भारतरत्न लता मंगेशकर आणि पद्मविभूषण अाशा भोसले यांच्या सुरेल मराठी कारकिर्दीवर आधारित अनाहत निर्मित आणि आर्च एंटर्प्रिझेस आयोजित “लताशा.” या कार्यक्रमात पं. हृदयनाथ मंगेशकर यांचा विशेष सहभाग असणार आहे. येत्या ३१ मार्च रोजी सायंकाळी ८:३० वाजता, दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विलेपार्ले येथे हा कार्यक्रम होणार आहे.आपल्या सुरेख आवाजाने गायिका सावनी रविंद्र हिने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. तिने मराठी चित्रपटसृष्टीत एक से एक गाणी गायिली आहेत. तिच्या प्रत्येक गाण्याने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले आहे. सावनी ही खूप चांगली गायिका म्हणून आपल्या सर्वांच्याच परिचयाची आहे. शास्त्रीय संगीताचा भक्कम पाया आणि पाश्चिमात्य संगीताची उत्तम समज असे कमालीचा कॉम्बो सावनीच्या आवाजात आपल्याला ऐकायला मिळतो. सावनीने मराठी इंडस्ट्रीप्रमाणेच तामिळ इंडस्ट्रीमध्ये देखील खूप गाणी गायली आहेत. काहीच दिवसांपूर्वी तिचे वेन्निलविन सालईगलिल हे गाणे प्रदर्शित झाले होते. तिच्या या गाण्याला सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात लाइक्स मिळाल्या होत्या. छोटया पडदयावरदेखील तिच्या आवाजाची जादू ऐकण्यास मिळाली. होणार सून ही मालिका संपून अनेक महिने झाले असले तरी या मालिकेचे तिने गायलेले शीर्षकगीत आजही प्रेक्षकांच्या चांगल्याच स्मरणात आहे.सावनी रविंद्रच्या घरी संगीत क्षेत्रातील दिग्गजांचे येणं-जाणं कायम असायचे. त्यातलं एक मोठ्ठं नाव म्हणजे पंडित हृदयनाथ मंगेशकरजी. त्यांच्याकडे बघून, ऐकून सावनी तयार झाली. वयाच्या १४व्या वर्षापासून ती त्यांच्यासोबत गाणी गावू लागली. हृदयनाथजी यांच्यासोबत ती अनेक वर्षं प्रोफेशनली गात होती आणि २०११ मधील ‘झी सारेगमप’ मध्ये सहभागी झाले आणि त्या सीजनची ती फायनलिस्ट ठरली. होणार सून मी या घरची या मालिकेच्या शीर्षकगीतामुळे तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. Also Read : सावनी रविंद्रचा झाला साखरपुडा