Join us

'रणांगण' चित्रपटाचा ट्रेलर लाँच,या तारखेला होणार संपूर्ण महाराष्ट्रात होणार प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2018 7:49 AM

हरहुन्नरी कलाकारांची मांदियाळी असलेल्या 'रणांगण'चित्रपटाचा ट्रेलर नुकताच मुंबईत लाँच करण्यात आला. या सोहळ्याला निर्माते करिष्मा जैन, जो राजन, सहनिर्माते ...

हरहुन्नरी कलाकारांची मांदियाळी असलेल्या 'रणांगण'चित्रपटाचा ट्रेलर नुकताच मुंबईत लाँच करण्यात आला.या सोहळ्याला निर्माते करिष्मा जैन, जो राजन, सहनिर्माते अर्जुन सिंह बर्रन, स्वप्नील जोशी, कार्तिक निशानदार बरोबरच चित्रपटाचे दिग्दर्शक राकेश सारंगबरोबरच संगीतातील दिग्गज अवधूत गुप्ते, राहुल रानडे, गुरू ठाकूर आणि कलाकार सचिन पिळगांवकर, प्रणाली घोगरे, आनंद इंगळे ही कलाकार मंडळी उपस्थित होती. नुकताच लाँच झालेल्या या ट्रेलरमधून चित्रपटातील प्रमुख कलाकारांच्याबरोबरीने दिसलेले संजय नार्वेकर, मुक्ता बर्वे हे चेहरे... यांची भूमिका नेमकी काय असणार हे चित्रपट पाहिल्यावर आपल्याला कळणार आहेच मात्र चित्रपटाच्या ट्रेलरवरून एक सुंदर,मनोरंजनात्मक चित्रीकरण रणांगणच्या निमित्ताने प्रेक्षकांसमोर येणार, एवढं नक्की. या चित्रपटाची कथा दिग्दर्शक राकेश सारंग यांनी लिहिली असून चित्रपटाच्या कथेला पूरक संगीत या चित्रपटाला लाभलेल्या अवधूत गुप्ते, राहुल रानडे आणि शशांक पोवार या संगीतकारांनी दिला आहे. तर सचिन पिळगांवकरांनीही एक गाणं संगीतबध्द करून आपली आणखी एक छटा प्रेक्षकांना दाखवून दिली आहे. या चित्रपटाला साजेशी गाणी गुरू ठाकूर आणि समीर सामंत यांनी लिहिली असून या चित्रपटाच्या गीतांना आनंदी जोशी, वैशाली माडे, स्वप्नील बांदोडकर, अवधूत गुप्ते यांचे स्वर लाभले आहेत.आजच्या युगात आजची कलाकृती मांडणारा 52 विक्स एंटरटेनमेंट आणि हार्वे फिल्म्स प्रस्तुत आणि ग्लोबल एंटरटेनमेंट मिडिया सॉल्यूशन्स (जीसिम्स) निर्मित रणांगण चित्रपट येत्या 11 मे ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.cnxoldfiles/a>शिक्षण आपल्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग आहे आणि त्यात शिक्षणमंत्र्याची भूमिका साकारणं ही एक जबाबदारीच हीच जबाबदार व्यक्तिरेखा सचिन पिळगांवकर साकारत आहेत.रणांगण या चित्रपटाच्यानिमित्ताने विविध शिक्षणसंस्थांमधील राजकारणाची हलकी झलक प्रेक्षकांसमोर येणार आहे.गेली कित्येक वर्ष हिंदी-मराठी सिनेसृष्टीत बालकलाकार ते दिग्दर्शक अशी सगळीच शिखरं सर करणारे सचिन पिळगांवकर आता राजकारणाच्या रणांगणातले डावपेच तितक्याच ताकदीने खेळणार आहेत.नुकताच लाँच झालेल्या लूक पोस्टरमध्ये दिसणारा सचिन पिळगांवकरांचा रोष सचिन पिळगांवकरांची एक वेगळीच बाजू प्रेक्षकांसमोर आणणार असल्याची ग्वाही देतो.शैक्षणिक रणांगणात पेटलेलं हे राजकारण लवकरच प्रदर्शित होणाऱ्या रणांगण या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.