Join us

वेद आणि विज्ञान यांच्यातील संबंध दर्शविणारा चित्रपट 'कानभट', मोशन पोस्टर केले लाँच

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2021 5:51 PM

'कानभट' या मराठी चित्रपटाच्या मोशन पोस्टरचे अनावरण पार पडले.

बॉलिवूडमधील प्रसिद्ध सिने निर्मात्या अपर्णा होशिंग यांच्या 'कानभट' या मराठी चित्रपटाच्या मोशन पोस्टरचे अनावरण पार पडले. कानभट मधील मुख्य भूमिकेतील अभिनेता भव्य शिंदेने आपल्या लूकमुळे सर्वांना चकित केले आहे. या मोशन पोस्टरमध्ये अभिनेता भव्य शिंदे दिसतो आहे. जो मंदिरात उभा आहे  आणि समोर प्रवाही गंगा नदी आहे. त्याच्यासमोर अभिनेते ऋग्वेद  मुळे एका पुजाऱ्याच्या भूमिकेत दिसत आहेत.

'कानभट' चित्रपटाची कथा एका लहान मुलाची स्वप्न आणि इच्छा ह्या भावनांवर बेतलेली आहे, त्या मुलाच्या जीवनात नियतीने काहीतरी वेगळेच वाढून ठेवले आहे, ज्यामुळे तो एका अकल्पित वाटेवर जातो, ज्यामुळे त्याचे जीवनच बदलून जाते. कथेत वेद आणि विज्ञान यांच्यातील संबंध दर्शविले गेले आहेत. पण हे केवळ तर्क आहेत. चित्रपटाबद्दल अजून जाणून घेण्यासाठी चाहत्यांना ट्रेलर रिलीज पर्यंत वाट बघावी लागेल.

दिग्दर्शक आणि निर्माता अपर्णा एस. होशिंग आपल्या चित्रपटाबद्दल सांगताना म्हणाल्या, मी दिग्दर्शित केलेल्या पहिल्याच चित्रपटाच्या पोस्टरला लोकांकडून हा उस्फुर्त प्रतिसाद मिळतोय, त्यामुळे मला खूपच आनंद झाला आहे. मला माझ्या पहिल्या चित्रपटासाठी असाच विषय शोधायचा होता, जेथे आधुनिक आणि पारंपारिक मूल्ये इतरांशी जोडली जातील. आणि अगदी तशीच कानभट्टची ही कथा स्वप्नाविषयी आणि वास्तवाविषयी भाष्य  करते. 

अपर्णा एस होशिंग दिग्दर्शित 'कानभट्ट' ची निर्मिती, आपल्या रॅश प्रॉडक्शन ह्या बॅनरखाली स्वतः अपर्णा होशिंग ह्यांनी केली आहे. हा चित्रपट आगामी १९ फेब्रुवारी २०२१ रोजी रिलीज होणार आहे. गेल्या दशकभरापासून बॉलीवूड मध्ये कार्यरत असणाऱ्या अपर्णा एस होशिंग ह्यांनी 'जीना है तो ठोक डाल, 'उटपटांग'  आणि 'दशहरा' सारख्या चित्रपटांची निर्मिती केली आहे.