अभिनेत्री निर्मिती सावंत(Nirmiti Sawant)ने चंद्रकांत कुलकर्णी यांच्या 'बिनधास्त' या चित्रपटातून मराठी कलाविश्वाच पदार्पण केले. आपल्या विनोदी भूमिकांसाठी निर्मिती ओळखली जाते. ती मराठी चित्रपटसृष्टीमधील एक प्रसिध्द अभिनेत्री आहेत. मराठी चित्रपट आणि मराठी मालिकांमध्ये काम करणाऱ्या निर्मिती सावंत यांनी रंगभूमीवर देखील बरेच काम केले आहे. दरम्यान निर्मिती सावंतने लोकमत फिल्मीच्या नो फिल्टर कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी तिने खासगी आणि इंडस्ट्रीतील अनेक किस्से सांगितले. तसेच तिने लक्ष्मीकांत बेर्डें(Laxmikant Berde)सोबतच्या आठवणींना उजाळा दिला.
निर्मिती सावंत म्हणाली की, लक्ष्मीकांत बेर्डे आणि माझे पती खूप चांगले मित्र होते. लक्ष्मीकांत बेर्डेंचं शेवटचं नाटक होतं बिघडले स्वर्गाचे दार किंवा सर आली धावून. या नाटकांचं दिग्दर्शन पुरुषोत्तम बेर्डेंनी केली होते. माझ्या नवऱ्याने लाइट्सचे काम केले होते. त्यांच्यात खूप चांगली मैत्री होती.
ती पुढे म्हणाली की, मी त्याच्याबरोबर कधी स्टेजवर काम केलेलं नाही. पण टूरटूर नावाची मालिका आली होती. ज्यात मी लक्ष्मीकांत बेर्डेंसोबत काम केले होते. त्यांच्यासोबत काम करायला खूप मज्जा आली होती. माझ्यात जे मिसिंग आहे ते त्यांच्याकडे होते. लक्ष्मीकांत खूप हजरजबाबी होते. त्यांच्याकडे उत्तरं तयार असायची आणि आपल्याला हसू यायचं. मी नेहमी म्हणायचे कसं सुचतं तुम्हाला यार.