Join us

सुयश टिळकच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घ्या तुमच्या लाडक्या सुयशबद्दल...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2017 4:26 PM

का रे दुरावा या मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेला अभिनेता सुयश टिळकचा आज वाढदिवस. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या या ...

का रे दुरावा या मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेला अभिनेता सुयश टिळकचा आज वाढदिवस. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या या कलाकारावर सकाळपासून सोशल मीडियावर चाहत्यांनी मोठया प्रमाणात शुभेच्छांचा वर्षाव केला असल्याचे पाहायला मिळत आहे. अशा या प्रेक्षकांच्या लाडक्या अभिनेत्याचा एकंदर अभिनय प्रवास, बालपण, शिक्षण तसेच त्याचा जीवनप्रवास लोकमत सीएनएक्सने खास जाणून घेतला. सुयश टिळकचे बालपण पुणे येथे गेले. त्याने आपले शालेय शिक्षण तीन शाळांमधून पूर्ण केले. पुण्यातील शिशुविहार औंध विद्यापीठ, मॉडर्न हायस्कूल आणि लक्ष्मणराव आपटे प्रशाला या तीन शाळेतून त्याने शिक्षणाचे धडे गिरवले. त्याचबरोबर त्याने महाविद्यालयीन शिक्षण फर्ग्युसन महाविद्यालयातून पूर्ण केले. सुयशला परिवारामध्येच कलेची आवड निर्माण झाली. कारण सुयशच्या आई प्रसिद्ध नृत्यागंणा आहेत. उमा टिळक असे त्याच्या आईचे नाव. त्या पुण्यातील प्रसिद्ध कलानिकेतन अ‍ॅकॅडमी येथे विद्यार्थ्यांना भरतनाट्यमचे शिक्षण देतात. सुयशने खरं तर चौथीपासून अभिनय करण्यास सुरुवात केली. त्याने चौथीमध्ये असताना एक नाटक रंगभूमीवर सादर केले. त्या दिवसांपासून ते आजपर्यंत त्याचे नाटकांविषयी असणारे प्रेम कायम असल्याचे पाहायला मिळते. अमरप्रेम या मालिकेतून त्याला पहिला ब्रेक मिळाला. यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. त्याने बंध रेशमाचे, भैरोबा, नाट्यरंग, पुढचं पाऊल, दुर्वा, का रे दुरावा अशा अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. नुकतीच त्याची सख्या रे ही मालिका सुरू झाली आहे.