Join us

बुद्धीवंत अन् किरवंत यांच्यातला संघर्ष...; अशोक सराफ यांचा जबरदस्त अभिनय, 'लाईफलाईन'चा ट्रेलर रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2024 12:11 PM

'लाईफलाईन' सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला असून अशोक सराफ यांचा आजवर कधीही न पाहिलेला वेगळा अंदाज पाहायला मिळतोय (ashok saraf)

गेल्या अनेक दिवसांपासून मराठी मनोरंजन विश्वात एका सिनेमाची चर्चा आहे तो म्हणजे 'लाईफलाईन'. नुकतेच महाराष्ट्र भूषण हा सन्मान मिळालेले अशोक सराफ या सिनेमात प्रमुख भूमिकेत आहेत. याशिवाय 'रात्रीस खेळ चाले' फेम अभिनेते माधव अभ्यंकर सिनेमात अशोक सराफ यांच्यासोबत काम करणार आहेत. या सिनेमाचा भन्नाट ट्रेलर रिलीज झालाय. ट्रेलरमध्ये बुद्धिवंत आणि किरवंत यांच्यातला संघर्ष बघायला मिळणार आहे.

लाईफलाईनचा ट्रेलर रिलीज

'लाईफलाईन'च्या ट्रेलरमध्ये डॉक्टर आणि किरवंताची लढाई दाखवण्यात आली असून ज्ञान आणि विज्ञान एकत्र आले तर कित्येक गरजूंचे प्राण वाचू शकतील, या मताचे डॉक्टर आहेत तर माणसाच्या आयुष्यात दोनच जण महत्वाचे असतात, एक भगवंत जो जन्म देऊन खाली पाठवतो आणि दुसरा किरवंत जो निरोप देऊन वर पाठवतो, या विचारसरणीचे किरवंत आहेत. त्यामुळे या लढाईत कोण जिंकणार, हे पाहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दरम्यान, आयुष्याचा प्रवास संपतो तेव्हा एका नवीन आयुष्याचा प्रवास सुरु होतो, याची जाणीव करून देणारा हा चित्रपट आहे. 

'लाईफलाईन' सिनेमा कधी होणार रिलीज?

'लाईफलाईन' सिनेमात अशोक सराफ, माधव अभ्यंकर, भरत दाभोळकर, हेमांगी कवी, जयवंत वाडकर, शर्मिला शिंदे, सुश्रुत मंकणी, अवधूत गुप्ते यांच्या प्रमुख भूमिका आहेत. क्रिसेंडो एंटरटेनमेंट प्रस्तुत 'लाईफलाईन' सिनेमाचे दिग्दर्शन साहिल शिरवईकर यांनी केले असून कथा, पटकथा आणि संवाद राजेश शिरवईकर यांचे आहेत. तर अशोक पत्की यांचे संगीत लाभलेल्या या सिनेमातील गाणी अवधूत गुप्ते आणि माधुरी करमरकर यांनी गायली आहेत. लालजी जोशी, कविता शिरवईकर, अमी भुता, मिलिंद प्रभुदेसाई, उदय पंडित, संचिता शिरवईकर, संध्या कुलकर्णी, शिल्पा मुडबिद्री आणि क्रिसेंडो एंटरटेनमेंट चित्रपटाचे निर्माते आहेत.  हा सिनेमा २ ऑगस्ट २०२४ ला रिलीज होणार आहे. 

टॅग्स :अशोक सराफरात्रीस खेळ चाले