Join us

हरवलेल्या नात्यांमधील हलकी-फुलकी लवस्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2016 7:42 AM

 प्रियांका लोंढे  हरवलेल्या नात्यांना पुन्हा नव्याने शोधण्याचा प्रयत्न करणारी कहाणी लॉस्ट अ‍ॅन्ड फाऊंड या सिनेमाच्या निमित्ताने प्रेक्षकांना पहायला ...

 प्रियांका लोंढे  हरवलेल्या नात्यांना पुन्हा नव्याने शोधण्याचा प्रयत्न करणारी कहाणी लॉस्ट अ‍ॅन्ड फाऊंड या सिनेमाच्या निमित्ताने प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. नेहमीच व्हर्सटाईल भुमिकांमधुन समोर येणारी स्पृहा जोशी या चित्रपटात देखील अनोख्या रुपात आपल्याला पहायला मिळणार आहे. या सिनेमाच्या संदर्भात स्पृहाशी सीएनएक्सने साधलेला हा मनमोकळा संवाद खास तुमच्यासाठी....  या चित्रपटातील तुझ्या भुमिकेविषयी काय सांगशील -: खरतर आम्ही जेव्हा कोणताही चित्रपट करतो तेव्हा त्यातील भुमिका ही वेगळीच असते. तशीच एक हटके भुमिका या चित्रपटात माझी आहे. पण ती एकदमच वेगळी अशी म्हणता येणार नाही. नैना हे कॅरेक्टर मी या चित्रपटात साकारीत आहे. ज्या मुलीने तिचे आयुष्यच गमावले आहे तिच्यापुढे काहीच उरले नाही. मग यातून बाहेर पडण्यासाठी ती काय करते, अशा स्वरुपाची ही भुमिका आहे.  या चित्रपटासाठी तु गीतकार म्हणुन देखील काम केले आहेस, हे कस जुळुन आलय. -: आधी माझ्याकडे हा चित्रपट आला आणि नंतर आमच्या संगीतकाराने या चित्रपटात गाणी लिहिण्यासाठी विचारले. यामध्ये माझ्या कॅरेक्टरच्या म्हणजेच नैनाच्या पर्ॉंट आॅफ व्ह्यु ने मी दोन गाणी लिहीला आहेत. आणि माझ्यावर कोणत्याही प्रकारचा प्रेशर गाणी लिहीण्यासाठी टाकला नाही. मला पुर्ण स्वतंत्र्या होते. शुट करतानाच मी गाणी लिहीली. दिवसा शुट अन रात्री हॉटेलवर पोहचल्यावर लिहीणे हे काम सुरुच होते. आभास हे अन जुनेच सारे ही गाणी मी लिहीलीय. हा चित्रपट एक सुंदर म्युझिकल अल्बमच आहे.             चित्रपट ऐकटेपणावर भाष्य करतो, तर तुला वैयक्तिक आयुष्यात कधी एकटेपणा आलाय का. -: सुदैवाने मला असा अनुभवच कधी आला नाही. मी छान कुटंूबात वाढलेली मुलगी आहे. आजुबाजुला सतत मित्र-मैत्रिणी असायच्या मग त्यांच्याशी बºयाच गोष्टी मी शेअर करायचे. त्यामुळे ऐकटेपणा कधी आलाच नाही. जर नैना सारखी परिस्थिती माझ्या वैयक्तीक आयुष्यात कधी आली तर तिच्यासारखी सेन्सिबल मी वागु शकले असते का हा प्रश्नच आहे.  या सिनेमात तुम्ही जशी डिप्रेशन मधुन बाहेर पडण्यासाठी लोकांची मदत करता तसे काही वैयक्तीक आयुष्यात करशील का. -: आम्ही या सिनेमात अ‍ॅन्टी लोनलीनेस प्रोग्रामच्या माध्यामातून लोकांचे प्रॉब्लेम्स सोडविण्याचा प्रयत्न करीत असतो. मला स्वत:ला एकटीला जगायला आवडत नाही. जेव्हा समोरच्या व्यक्तीला माझी गरज असेल तेव्हा मी नक्कीच जाऊन त्यांचा प्रॉब्लेम आधी ऐकेल अन मग तो सोडविण्याचा प्रयत्न नक्कीच करेल.  या सिनेमातील भुमिका साकारताना तुला काय शिकायला मिळाले. -: प्रत्येक भुमिकाच कलाकाराला काही ना काही देत असते शिकवित असते. तसेच मी हा चित्रपट करताना अनेक गोष्टी जवळून अनुभवल्या. मी जरी कधी एकटी पडली नसले तरी एकाकी आयुष्य जगणाºयांच्या वाटेला काय दुख: असते याची जाणीव झाली. त्यामुळे मी ठरविले आहे की आता यापुढे समोरच्या माणसाचे बोलणे आधी ऐकुण घ्यायचे. त्यांच्या अडचणी काय आहेत हे समजुन घेण्याचा मी नक्कीच प्रयत्न करीन. आणि सर्वात महत्वाच म्हणजे जेव्हा समोरच्याला आपली गरज असते तेव्हा त्याचा म्हणन ऐकुन घेणे जास्त महत्वाचे असते.