मराठी मनोरंजन विश्वात एका सिनेमाची सध्या चांगलीच चर्चा आहे हा सिनेमा म्हणजे 'लाईक आणि सबस्क्राइब'. काहीच दिवसांपूर्वी हा सिनेमा थिएटरमध्ये रिलीज झाला होता. सिनेमाचं वेगळं कथानक आणि कथेची वेगळी मांडणी यामुळे हा सिनेमा चांगलाच गाजला. आता 'लाईक आणि सबस्क्राइब' सिनेमा प्रेक्षकांना घरबसल्या पाहायला मिळणार आहे. जाणून घ्या अमेय वाघ-अमृता खानविलकरचा 'लाईक आणि सबस्क्राइब' कुठे पाहू शकता.
या ठिकाणी पाहू शकता 'लाईक आणि सबस्क्राइब'
व्लॉगरच्या रहस्यमय आणि धक्कादायक जगातील कथा सांगणारा ‘लाईक आणि सबस्क्राईब’ चित्रपट आता प्राईम व्हिडीओवर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. नितीन वैद्य प्रॉडक्शन्स आणि अभिषेक मेरूकर प्रॉडक्शन्स निर्मित या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन अभिषेक मेरूकर यांनी केले आहे. चित्रपटात अमेय वाघ, अमृता खानविलकर, जुई भागवत, शुभंकर तावडे, आणि विठ्ठल काळे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटात व्लॉगरच्या आयुष्यातील गूढ आणि धक्कादायक घटनेचा थरार दाखवला आहे, जो प्रेक्षकांना अखेरपर्यंत खिळवून ठेवतो.
सिनेमाचे दिग्दर्शक आणि निर्माते काय म्हणतात
'लाईक आणि सबस्क्राइब' चित्रपटाचे दिग्दर्शक अभिषेक मेरूकर म्हणतात, “प्रेक्षक आता ‘लाईक आणि सबस्क्राईब’ प्राईम व्हिडीओवर पाहू शकतात. या चित्रपटातून व्लॉगरच्या आयुष्यातील रहस्य आणि थरार पाहाणे प्रेक्षकांसाठी नक्कीच रंजक ठरेल.”निर्माते नितीन प्रकाश वैद्य म्हणतात, “आम्ही हा चित्रपट प्रेक्षकांसाठी प्राईम व्हिडीओवर उपलब्ध केला आहे. या रहस्यमय कथेचा आता घरबसल्या आनंद घेता येईल.”