Join us

लिव्ह इन म्हणजे प्रेमाच्या पुढचा टप्पा - दिग्दर्शक प्रवीण कारळे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2018 8:59 AM

भरधाव वेगाने पुढे जाणाऱ्या आणि भन्नाट कंटेंटसह प्रेक्षकांचं मनोरंजन एक नवीन कोरी रोमँटीक वेब सिरीज रसिकांच्या भेटीला आली आहे. ...

भरधाव वेगाने पुढे जाणाऱ्या आणि भन्नाट कंटेंटसह प्रेक्षकांचं मनोरंजन एक नवीन कोरी रोमँटीक वेब सिरीज रसिकांच्या भेटीला आली आहे. ती म्हणजे ‘उफ मेरी अदा’.या वेब सिरीजचा पहिला भाग लोकांना प्रचंड आवडला आणि त्याला खूप चांगला प्रतिसादही मिळाला.नुकतेच या वेब सिरीजचा प्रिमियर मुंबईत मोठ्या जल्लोषात संपन्न झाला.या कार्यक्रमासाठी दिग्गज मंडळी उपस्थित होती.यावेळी दिग्दर्शक प्रवीण राजा कारळे,संदीप मनोहर नवरे यांच्यासह कॅफेमराठी चे संस्थापक निखील रायबोले उपस्थित होते.यावेळी दिग्दर्शक प्रविण कारळे यांनी सांगितले की, मराठीमध्ये ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ सारखे विषय जास्त हाताळले जात नाहीत. मात्र, कॅफे मराठीने केलेला प्रयत्न खूप चांगला आहे,धाडसी आहे म्हणूनच कौतुकास पात्र आहे. त्यांनी तो विषय अगदी सहज सोप्या पद्धतीने आणि युवकांना लक्षात ठेऊन मांडला आहे. येत्या काळात असे विषय लोकांसमोर मांडण्याची गरज आहे. आणि त्याची सुरवात  म्हणेज ही वेबसिरीज असल्याचा आनंद आहे.”तसेच,“वेब सिरीजची थीम तर उत्तम होतीच,पण ती अजून उत्तम बनली ते त्यातील कलाकारांमुळे.प्रत्येक कलाकाराने छान काम केले आहे.”असे मत दिग्दर्शक संदीप नवरे यांनी मांडले.विशेष म्हणजे संदीप नवरे यांनी याआधी 'लुख्खे लांडगे' आणि 'डॉटेड की फ्लेवर्ड' ही वेब सिरीज दिग्दर्शित केली होती.यावेळी ‘उफ मेरी अदा’ मध्ये काम केलेले कलाकार म्हणजे भुमी दळी, यशोधन तक, राजू जगताप, हृषिकेश पाटील, प्रथमेश पुराणिक आणि भूपेंद्रकुमार नंदन उपस्थित होते.मराठी सिनेमांप्रमाणेच विविध कथा संकल्पनेवर आधारीत वेबसिरिजही निर्मिती होत आहे.नवा आशय आणि नवी स्टारकास्टसह एक नवीन वेबसिरिज रसिकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाली आहे.प्रेमात पडल्यावर पुढचा टप्पा येतो तो लग्नाचा.पण किती प्रेमी युगल प्रेमात एकत्र जगण्या - मरण्याच्या आणाभाका घेतल्यानंतर लग्नाच्या बंधनात अडकतात.त्यामुळेच अलीकडच्या काळात एकमेकांना अधिक जवळून समजून घेण्यासाठी लिव्ह इन रिलेशनशिप हा ट्रेंड वाढत जातंय.लग्न न करता स्वतःहून ठरवून दोघांनी एकत्र राहणे म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिप.याचा जसा फायदा आहे तसा तोटा देखील आहे.अजूनही ही संकल्पना मराठी संस्कृतीत तेवढी रुजली नाहीये.अशाच प्रेमात पडलेल्या प्रेमी युगलांची फ्रेश लव्ह स्टोरी असलेली “उफ्फ मेरी अदा”ही वेबसिरीज आहे.