Join us  

मतदान केंद्रावर गेली पण मतदानच करता आलं नाही, सावनी रविंद्रबरोबर नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2024 12:15 PM

Savani Ravindra : गायिका सावनी रविंद्र हिला मतदानाचा हक्क बजावता न आल्यामुळे तिने सोशल मीडियावर खेद व्यक्त केला आहे.

राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये आज लोकसभेचे चौथ्या टप्प्यातील मतदान (Loksabha Election 2024) सुरु झाले आहे. सकाळी सात वाजल्यापासूनच लोकांनी रांगा लावल्या असून अनेक ठिकाणी ईव्हीएम बिघडण्याच्या तक्रारी येत आहेत. तसेच काहींची मतदान यादीत नावे चुकल्यामुळे तर काहींची नावे यादीत नसल्यामुळे काही मतदारांना मतदान करता आलेले नाही. असाच काहीसा अनुभव गायिका सावनी रविंद्र (Savani Ravindra) हिला आला आहे. तिचे नाव मतदार यादीत नसल्यामुळे तिला मतदान करता आले नाही. तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत खेद व्यक्त केला आहे.

सावनी रविंद्र हिने इंस्टाग्रामवर मतदान केंद्रावरचा तिचा सेल्फी शेअर करत लिहिले की, गेले अनेक दिवस सर्व ऑनलाइन पोर्टलवर मतदारांच्या यादीत नाव शोधण्याचा प्रयत्न करूनही नाव सापडले नाही. शेवटी आज मतदान केंद्रावर जाऊन नाव शोधण्याचा प्रयत्न केला. तरीही नाव सापडले नाही. ( ज्या ठिकाणी मी गेली अनेक वर्षे मतदान करत आहे त्याच ठिकाणी) आमच्या घरातील बाकी सर्व सदस्यांची नावं आहेत पण माझे नाही.

तिने पुढे लिहिले की, या बद्दल स्वतः वोटिंग ऑफिसरची त्या ठिकाणी जाऊन भेट घेऊन AED पर्यायाने वोट करू शकते का याबद्दल विचारणा केली, त्यांनी नकार दिल्याने मत न देताच परत यावे लागले. अत्यंत खेदजनक. महाराष्ट्र सरकार.

टॅग्स :लोकसभा निवडणूक २०२४