बिकिनीमध्ये दिसली टीव्हीची 'बढो बहू',पाहा PHOTO
By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2017 12:41 PM
सिनेमा असो किंवा मालिका सुंदर दिसण्यासाठी कित्येक अभिनेत्री तासनतास जिममध्ये वर्कआऊट करताना दिसतात. योग्य डाएट प्लॅन करत त्यानुसारच फिटनेसकडे ...
सिनेमा असो किंवा मालिका सुंदर दिसण्यासाठी कित्येक अभिनेत्री तासनतास जिममध्ये वर्कआऊट करताना दिसतात. योग्य डाएट प्लॅन करत त्यानुसारच फिटनेसकडे लक्ष देत स्वतःला झिरो फिगर कशी मिळवता येईल यावरच जास्त मेहनत घेतात.मात्र एक टीव्ही अभिनेत्री आहे जिला आपण जसे आहोत तसेच राहणार,कोणासाठी का बरं स्वतःला बदलावे.मग ते करिअर असो किंवा आणखी काही जसे दिसतोय जसे आहोत त्याच गोष्टीच्या बळावर यश मिळवलं आहे.अभिनय क्षेत्रात जास्त जाड मुलींना अभिनेत्री म्हणून संधी मिळणे अभावणेच पाहायला मिळतं. 'बढो बहू' मध्ये कोमलची भूमिका करणारी रिताशा राठोडनेही अल्पवाधीतच आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकली आहे. मुळात ऑनस्क्रीन बिनधास्त आणि देसी अंदाजात दाखवली असली तरी ती रिअल लाइफमध्ये मात्र तितकीच बोल्ड आणि बिनधास्त.सध्या रिताशा गोव्यात हॉलिडे एन्जॉय करत आहे. तिने व्हॅकेशन एन्जॉय करत असल्याचे काही फोटो इन्स्टाग्रावरही शेयर केले आहेत. एका फोटोमध्ये ती ब्लॅक बिकिनीमध्ये स्विमिंग पूलमध्ये मस्त एन्जॉय करताना दिसतेय.बिकिनीमधला फोटो शेयर करत तिने त्या फोटोला समर्पक अशी कॅप्शनही दिली आहे.'बढो बहू' तिची पहिलीच मालिका आहे.रिताशा इन्स्टाग्रामवर अॅक्टीव्ह असून ती नेहमी तिचे ग्लॅमरस फोटो पोस्ट करत असते.ती सतत अॅक्टीव्ह असल्यामुळे तिच्या चाहत्यांच्या संख्येतही वाढ होत आहे. 'बढो बहू' या मालिकेत प्रेक्षकांना लकी सिंह आणि कोमल या दाम्पत्याची मनोरंजक कथा पाहायला मिळत आहे. या दोघांचे लग्न त्यांच्या मनाविरुद्ध झालंय. प्रिन्स नरुला यात रेसलरच्या भूमिकेत दिसत असून त्यासाठी त्याने बरीच मेहनत घेतली आहे. तसेच हरयाणवी भाषाही शिकली आहे. विशेष म्हणजे रिताशाने तिच्या भूमिकेसाठीही खूप मेहनत घेतली.दंगल सिनेमाप्रमाणे काहीशी कथा प्रेक्षकांना बढो बहू या मालिकेत पाहायला मिळाली. 100 किलोंची बढो बहू म्हणजेच रिताशा आता मालिकेत कुस्तीचे प्रशिक्षण घेताना दिसली. प्रिन्स नरुला या मालिकेत पुरस्कारविजेत कुस्तीपट्टू दाखवण्यात आला होता.प्रिन्सप्रमाणेच रिताशानेही मालिकेसाठी कुस्तीतील डावपेच शिकले आहेत.दोघांनीही आपापल्या भूमिकेने रसिकांचे तुफान मनोरंजन केले.