Join us

हे पाहा... सैराटचे यश अदयाप ही

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2016 1:18 PM

नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट या चित्रपटाने प्रेक्षकांचे मनावर आधिराज्य गाजविले आहे. त्याचप्रमाणे या चित्रपटाने बॉक्सआॅफिसवरदेखील करोडोंचा गल्ला कमविला आहे. तसेच मराठी चित्रपटसृष्ट्रीतील सर्व रेकॉर्ड मोडत काढत या चित्रपटाने बाजी पटकावली आहे. या चित्रपटांची गाणी तर आज ही प्रेक्षक तेवढयाच उत्सुकतेने ऐकत असल्याचे पाहायला मिळत आहे. आज ही लहानांपासून ते मोठयापर्यत प्रत्येकाच्या ओठी सैराट चित्रपटातील गाणी गुणगुणताना दिसत आहे.

नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट या चित्रपटाने प्रेक्षकांचे मनावर आधिराज्य गाजविले आहे. त्याचप्रमाणे या चित्रपटाने बॉक्सआॅफिसवरदेखील करोडोंचा गल्ला कमविला आहे. तसेच मराठी चित्रपटसृष्ट्रीतील सर्व रेकॉर्ड मोडत काढत या चित्रपटाने बाजी पटकावली आहे. या चित्रपटांची गाणी तर आज ही प्रेक्षक तेवढयाच उत्सुकतेने ऐकत असल्याचे पाहायला मिळत आहे. आज ही लहानांपासून ते मोठयापर्यत प्रत्येकाच्या ओठी सैराट चित्रपटातील गाणी गुणगुणताना दिसत आहे. अशी या चित्रपटांची क्रेझ लहान मुलांमध्येदेखील ओसंडून वाहत आहे. या चित्रपटाच्या यशानंतर कित्येक लहान मुलांपासून ते नवोदित वरवधूपर्यत प्रत्येकजण या गाण्यांतील आर्ची आणि परश्याची भूमिका साकारताना दिसत आहेत. कारण या सर्व चाहत्यांनी स्वत:ची अशी वैयकितक सैराटमधील गाणी, डायलॉग, सीन्स, डान्सचा व्हिडीओ बनवून सोशलमीडियावर अपलोड केला आहे. त्यांच्या या व्हिडीओ सोशलमीडियावर प्रचंड लाइक्स व भरभरून कमेंन्टस पाहायला मिळत आहे. असाच एक लहान मुलाचा व्हिडीओ सोशलमीडियावर कल्ला करताना पाहायला मिळत आहे. हा लहान मुलगा सैराटमधील गाणं गाताना दिसत आहेत. त्याच्या या गाण्याला नेटिझन्सने अक्षरश: डोक्यावर घेतलं आहे. कारण त्याचे हे गाणे आतापर्यत ४ कोटी ८ लाख ३२ हजार लोकांनी पाहिलं आहे. सोशलमीडियाचा आकडा पाहता नक्कीच आश्चर्याचा धक्का बसला असणार हे मात्र खरं. सैराटच्या यशानंतर ही आज हा चित्रपट आणि यातील गाण्यांनी आजही प्रेक्षकांना तितक्याच ताकदीने बांधून ठेवले आहे. तसेच या चित्रपटातील रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर या कलाकारांच्या अभिनयाचेदेखील विशेष कौतुक करण्यात आले. त्यांच्या अभिनयाने तर प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. आर्ची आणि परश्याची ही जोडी मराठी चित्रपटसृष्ट्रीत हिट ठरली असल्याचे पाहायला मिळाले. माज्ञ सोशलमीडियाच्या या लहान मुलांच्या गाण्याने  पुन्हा एकदा सैराटच्या यशाची आठवण करून दिली े म्हणण्यास हरकत नाही.