Join us

ही मराठी अभिनेत्री करते जबरदस्त योगा, हटके पोजेस पाहून भल्या भल्यांची होते बोलती बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2021 2:11 PM

योगासोबतच दररोज 45 मिनिटांचा वॉक घेते. नियमित योगा आणि चालण्यामुळे फिजिकल आणि मेंटल बॅलेन्स ठेवणे शक्य होते. व्यायामुळे मला दिवसभर प्रसन्न वाटतं." 

 अभिनेत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून रसिकांसह शेअर करतात. या फोटोंना सोशल मीडियावर रसिकांकडून पसंती मिळते. अभिनेत्री माधवी निमकरचा असाच एक ग्लॅमरस फोटोंना सोशल मीडियावर फॅन्सना भावतो. सध्या बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्री आपल्या हटके योगा पोजेसने चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.

 

 

दुसरीकडे मराठी अभिनेत्रीही बॉलिवूडच्या फिटनेस फ्रिक अभिनेत्रींना जोरदार टक्क देत असल्याचे पाहायला मिळतंय. माधवी निमकरच्या या भन्नाट आणि हटके पोज पाहून चाहते थक्कच झाले आहेत. इतकेच काय तर सेलिब्रेटी मंडळीही तिच्या फिटनेस फंडा पाहून कमेंट करत कौतुक करताना पाहायला मिळत आहेत.फिट राहण्यासाठी माधवी नियमित योगा करते.

 

माधवीच्या फिट राहण्यामध्ये योगविद्येचे मोलाचे योगदान असून ती तिच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर देखील तिच्या योगा पोझेस मधील फोटोज तिच्या चाहत्यांसाठी शेअर करते.माधवी निमकरच्या सोशल मीडियावर नजर टाकल्यास तुम्हाला तिचे योगा करतानाचे विविध पोज पाहायला मिळतील.

नित्यनियमाने माधवी योगा करते याबबात तिने सांगितले होते की, “फिट राहण्यासाठी योगापेक्षा दुसरा चांगला पर्याय असूच शकत नाही. त्यामुळं मी पारंपरिक योगा करते. गेल्या अनेक वर्षांपासून मी योगा करत आले आहे. योगामुळे मला खूप फायदा झाला. पण कधी कधी महिन्याभराचा व्यायामाला ब्रेक झाल्यास, माझे वजन झपाट्याने वाढते. अशावेळी योगाच्या मदतीने मी वजन पुन्हा नियंत्रणात आणले.

 

योगासोबतच दररोज 45 मिनिटांचा वॉक घेते. नियमित योगा आणि चालण्यामुळे फिजिकल आणि मेंटल बॅलेन्स ठेवणे शक्य होते. व्यायामुळे मला दिवसभर प्रसन्न वाटतं." 

 घर आणि करिअर करताना माधवीचीसुद्धा तारेवरची कसरत सुरु असते. पण एवढ्या बिझी शेड्युलमध्येही ती स्वतःच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देते आणि नियमित व्यायाम करते. यासाठी माधवी योगाची मदत घेते. पारंपरिक योगाला तिची पसंती आहे.