Made for Each Other: लग्नाच्या २५ व्या वाढदिवशी प्रसाद ओकने पत्नी मंजिरीसाठी शेअर केली खास पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2022 04:09 PM2022-01-07T16:09:46+5:302022-01-07T16:10:19+5:30
प्रसाद (Prasad Oak) आणि मंजिरी चित्रपटसृष्टीतील एक गोड दाम्पत्य म्हणून ओळखलं जातं. दोघांची जोडी परफेक्ट असून दोघं एकमेकांना समजून घेतात. दोघांमध्येही आजही खूप चांगली केमिस्ट्री असल्याचे पाहायला मिळतं.
दिग्दर्शन, अभिनेता, सुत्रसंचालक अशा वेगवेगळ्या व्यक्तिरेखांमधून प्रसाद ओक (Prasad Oak) नेहमीच चाहत्यांच्या भेटीसाठी येत असतो. मालिका,टीव्ही शो, सिनेमा असो प्रसादने सर्वच भूमिकांना योग्य न्याय दिला आहे.प्रसादने आपल्या अभिनयाच्या बळावर स्वतःची मोठी फॅन फॉलोईंग निर्माण केली आहे. तो सोशल मीडियाच्या माध्यमातूनही चाहत्यांच्या संपर्कात असतो. प्रसाद आपल्या कुटुंबियांचे फोटो देखील इन्स्टाग्रामवर शेअर करत असतो.इतकंच काय तर अनेकदा पत्नीसोबत खास फोटो शेअर करत कपल गोलही देत असतो. आपल्या सोशल मीडियावरील फोटोंमुळे प्रसाद नेहमीच चर्चेत चाहत्यांची वाहवा मिळवत असतो. प्रसाद आणि मंजिरी चित्रपटसृष्टीतील एक गोड दाम्पत्य म्हणून ओळखलं जातं. दोघांची जोडी परफेक्ट असून दोघं एकमेकांना समजून घेतात. दोघांमध्येही आजही खूप चांगली केमिस्ट्री असल्याचे पाहायला मिळतं.
आता प्रसाद आपल्या नव्या पोस्टमुळे चर्चेत आहे. ही पोस्ट त्यांने खास पत्नी मंजिरीसाठी केली आहे. ही पोस्ट करण्यास खास कारणही आहे कारण त्यांच्या लग्नाला 25 वर्ष पूर्ण झाले आहेत. लग्नाचा २५ वा वाढदिवस आज दोघेही साजरा करत आहेत. या पोस्टवर चाहतेही शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. मुळात प्रसाद आणि मंजिरीचे लग्न कसे जुळले याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. २५ वर्षांपूर्वी रेशीमगाठीत अडकलेल्या प्रसाद आणि मंजिरीची लव्ह स्टोरी सिनेमातील कथेला साजेशीच म्हणावी लागेल.
7 जानेवारी 1998 रोजी प्रसाद आणि मंजिरीचे लग्न झाले होते. या दोघांचे हे लव्ह मॅरेज आहे.प्रसादचा भाऊ हा मंजिरीचा मित्र. मंजिरीलासुद्धा अभिनयाची आवड असल्याने सदानंदच्या माध्यमातून ती प्रसादच्या अभिनयाच्या कार्यशाळेमध्ये सहभागी झाली होती. साधारण तीन महिने ही कार्यशाळा होती. त्यावेळी प्रसाद एका नाटकासाठी मंजिरीला शिकवत होता. त्याच काळात हे दोघे एकमेकांच्या जवळ आहे. जाणून आश्चर्य वाटले पण या दोघांमध्ये कुणीही कुणाला प्रपोज केले नव्हते. पण एकमेकांना चांगले ओळखायला लागले होते. दोघांच्या आवडी-निवडी समजल्यानंतरच आयुष्यभराचे जोडीदार होऊ शकतो, हे दोघांना उमगले आणि त्यांनी लग्नाचा निर्णय घेत आयुष्याची नवीन सुरुवात केली होती.