Join us

​गोवा मराठी चित्रपट महोत्सवात सादर होणार माधुरी दीक्षितची ‘बकेट लिस्ट’

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2018 11:20 AM

चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या माधुरी दिक्षितच्या मराठी पदार्पणातला चित्रपट म्हणजे ‘बकेट लिस्ट’… माधुरीच्या पदार्पणातला हा चित्रपट असल्याने या चित्रपटाभोवती ...

चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या माधुरी दिक्षितच्या मराठी पदार्पणातला चित्रपट म्हणजे ‘बकेट लिस्ट’… माधुरीच्या पदार्पणातला हा चित्रपट असल्याने या चित्रपटाभोवती एक वेगळंच वलय निर्माण झालं होतं. प्रेक्षकांचे हेच प्रेम बॉक्स ऑफिसवर प्रकर्षाने जाणवलं. प्रेक्षकांवर आपली जादू केल्यानंतर आता माधुरीची ही बकेट लिस्ट चित्रपट महोत्सवांमध्ये आपलं नाणं वाजवण्यासाठी सज्ज झाली आहे. गोवा मराठी चित्रपट महोत्सव, २०१८ मध्ये जगण्याची नवी उमेद देणारा हा चित्रपट दाखवला जाणार आहे.२००८ साली सुरुवात झालेल्या या गोवा मराठी चित्रपट महोत्सवाने १० वर्षं पूर्ण केली आहेत. मानाचा समजला जाणाऱ्या या चित्रपट महोत्सवात चांगल्या कलाकृतींचा सन्मान नेहमीच केला गेला आहे. हीच परंपरा पुढे नेत यंदाही अशा विविध कलाकृतींचे सादरीकरण या चित्रपट महोत्सवात केले जाणार आहे. ज्यात तेजस प्रभा विजय देऊस्कर दिग्दर्शित बकेट लिस्ट या चित्रपटाचा समावेश आहे.करण जोहर आणि ए. ए. फिल्म्स प्रस्तुत आणि डार्क हॉर्स सिनेमाज, दार मोशन पिक्चर्स, ब्लू मस्टँग क्रिएशन्स निर्मित ‘बकेट लिस्ट’ चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन तेजस प्रभा विजय देऊस्कर यांनी केले आहे तर सहलेखन देवश्री शिवडेकर यांनी केले आहे.२५ मे ला प्रदर्शित झालेल्या माधुरीच्या या बकेट लिस्टने आतापर्यंत ६ करोड ९५ लाख चा गल्ला जमवलेला आहे आणि सिनेमाची घोडदौड अजूनही यशस्वीरित्या चालली असून चित्रपटाची मोहिनी प्रेक्षकांवर अजूनही कायम आहे.केट लिस्ट या चित्रपटात माधुरीने पुण्यात राहाणाऱ्या एका स्त्रीची भूमिका साकारली होती. पुण्यात राहाणाऱ्या लोकांची बोलण्याची ढब ही मुंबईतील लोकांपेक्षा वेगळी असते. त्यामुळे माधुरीने ही ढब शिकली. एवढेच नव्हे तर या चित्रपटातील काही दृश्यांमध्ये माधुरी आपल्याला बाईक चालवताना दिसली होती. त्यामुळे या चित्रपटासाठी ती बाईक चालवायला सुद्धा शिकली होती.माधुरीसोबत वंदना गुप्ते, सुमीत राघवन, शुभा खोटे आणि रेणुका शहाणे या कलाकारांच्या या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत.Read : ​​जाणून घ्या मराठी चित्रपटात काम करण्याबद्दल काय मत आहे काजोलचे