Join us  

बोल्ड सीन किंवा बोल्ड भूमिकाबाबत कुटुंबीयांची काय असते प्रतिक्रिया ? माधुरी पवारने स्पष्टचं सांगितलं...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2024 4:32 PM

माधुरीने 'लोकमत फिल्मी'शी बोल्ड भुमिकांबाबत कुटुबीयांची काय प्रतिक्रिया असते, याबद्दल सांगितले आहे.

मराठमोळी अभिनेत्री आणि नृत्यांगना माधुरी पवारचा (Madhuri Pawar) मोठा चाहतावर्ग आहे. माधुरी आज घराघरांत पोहोचली असली तरी तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. आता 'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत माधुरीने तिच्या संघर्षाबद्दल मोकळेपणाने बोलली. यासोबत तिनं 'रानबाजार' सीरिजमध्ये साकारलेल्या भुमिकेवरही भाष्य केलं. 

माधुरीने 'लोकमत फिल्मी'शी बोलताना बोल्ड भुमिकांबाबत कुटुबीयांची काय प्रतिक्रिया असते, याबद्दल सांगितले आहे. ती म्हणाली, 'मला खूप वेगवेगळ्या भुमिकांसाठी विचारणा होते. भुमिका कुठलीही असो ती चांगलीच असते. माझ्याकडे येणाऱ्या भुमिका जास्त करुन बोल्ड असतात. पहिल्यांदा तर बोल्ड या शब्दाचा अर्थ मी वेगळा घेते. लोकांना छोटे कपडे घातले तर त्या गोष्टी बोल्ड वाटतात. त्याबाबत माझं मत थोडं वेगळं आहे. मला वाटतं बोल्ड म्हणजे तुमची हिंमत'.

पुढे ती म्हणाली, 'सीरिजमध्ये शिव्या असतात. रानबाझारमध्ये काही डॉयलॉग आहेत. पण, ती कथानकाची गरज आहे. हे जेव्हा माझ्या घरातले बघतात, तेव्हा ते माझी मजा घेतात. म्हणजे घरी एखादा कार्यक्रम असेल आणि सगळे एकत्र आले की ते मला रानबाजारमधील डॉयलॉग बोलायला सांगतात.  माझ्या घरचे मला पाठिंबा देतात. त्यामुळे बोल्ड भुमिकांबद्दलचा माझा दृष्टिकोण बदलला आहे'. 

माधुरी म्हणाली, 'तु एवढे छोटे कपडे का घातले, असे सिन्स का केले, असं फोटोशूट का केलं, माझ्या घरचे मला कधीच, असं काहीचं म्हणत नाहीत. माझ्या घरचे कुणीच शिकलेले नाहीत. पण, त्यांची विचारधारा ही शिक्षित आहे. ते मला समजू शकतात की, हे काम आहे. त्यामुळे अशी कुठलीही भीती नाही वाटतं. उद्या मला हॉलिवूडमध्ये जाण्याची संधी मिळाली आणि तिथे एखादा सीन करावा लागला. तर तोही सीन मी चांगला करेल. लोक काय म्हणतील म्हणून कधीच कोणती गोष्ट नाकारणार नाही. कथानक जर स्ट्रॉग असेल तर मी नक्की करेल', असं तिनं म्हटलं.  

टॅग्स :सेलिब्रिटीमराठी अभिनेतासिनेमा