Join us  

महाराष्ट्र केसरी विष्णू जोशीलकर चित्रपटात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2016 9:18 AM

शरीरसौष्ठव स्पर्धांमध्ये बाजी मारणाºया काही पैलवानांनी नंतर रूपेरी पडद्यावरही आपलं नशीब आजमावलं आहे. दारा सिंह हे याचं उत्तम उदाहरण ...

शरीरसौष्ठव स्पर्धांमध्ये बाजी मारणाºया काही पैलवानांनी नंतर रूपेरी पडद्यावरही आपलं नशीब आजमावलं आहे. दारा सिंह हे याचं उत्तम उदाहरण आहे. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत आजवर बरेच पैलवान चित्रपटसृष्टीत दाखल झाले आहेत. शरीरसौष्ठव स्पर्धांमध्ये पैलवानकीचा ठसा उमटवत महाराष्ट्र केसरीचे विजेते ठरलेले विष्णू बाबू जोशीलकरही लवकरच रूपेरी पडद्यावर चमकणार आहेत.तालिम या आगामी मराठी चित्रपटात विष्णू जोशीलकर वस्तादची भूमिका साकारत आहेत. रघुजन आणि रोअरिंग गोट या ब्यानर अंतर्गत निमार्ते कुमार इंगळे तालिम या चित्रपटाची निर्मिती करीत असून एनएमआर फिल्म्स या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ता आहेत. दिग्दर्शक नितीन मधुकर रोकडे यांनी विष्णू जोशीलकर यांना चंदेरी दुनियेत आणण्याची किमया साधली आहे. तालिममध्ये विष्णू जोशीलकर यांच्यासह अभिजीत श्वेतचंद्र, वैशाली दाभाडे, मिताली जगताप, छाया कदम, अनिकेत गायकवाड, प्रशांत मोहिते, यशपाल सारनाथ, विद्या सावले यांच्या प्रमुख भूमिका आहेत.