Join us

महाराष्ट्राची लाडकी जोडी रितेश-जिनिलियाची सुपरहीट केमेस्ट्री; व्हिडीओनं जिंकली चाहत्यांनी मनं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2024 17:46 IST

मराठमोळा अभिनेता आणि बॉलिवूड (Bollywood) सुपरस्टार रितेश देशमुख आणि महाराष्ट्राची लाडकी वहिनी जिनिलिया देशमुखच्या (Genelia Deshmukh) यांच्या एका व्हिडीओनं चाहत्यांनी मनं जिंकली आहेत. 

गेल्या वर्षभरात प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपटांना आणि संबंधित विभागांना सन्मानित करणारा  'महाराष्ट्राचा फेवरेट कोण ?' (Maharashtracha Favourite Kon) हा पुरस्कार सोहळा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अनेक मराठी सेलिब्रिटींची ग्लॅमरस झलक या सोहळ्यात पाहायला मिळाली. 'झी टॉकिज'ने या सोहळ्याचा प्रोमो शेअर केला आहे. यामध्ये मराठमोळा अभिनेता आणि बॉलिवूड (Bollywood) सुपरस्टार रितेश देशमुख आणि महाराष्ट्राची लाडकी वहिनी जिनिलिया देशमुखच्या (Genelia Deshmukh) यांच्या एका व्हिडीओनं चाहत्यांनी मनं जिंकली आहेत. 

 "महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण' या पुरस्कार सोहळ्यामध्ये रितेश देशमुखला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून पुरस्कार देत गौरविण्यात आले. हा पुरस्कार स्वीकारताना रितेश देशमुखने पत्नी जेनेलियाचे कौतुक केलं.  रितेशनं पुरस्काराचं श्रेय पत्नीला दिलं. तो म्हणाला, 'पहिली व्यक्ती जिने मला, मी दिग्दर्शक होऊ शकतो असं सांगितलं. ती म्हणजे माझी बायको जिनिलीया. त्यामुळे माझा हा दिग्दर्शक म्हणून पहिला पुरस्कार जिनिलीया फक्त तुमच्यासाठी'. यानंतर  दोघांनी एकमेकांना घट्ट मिठी मारत प्रेम व्यक्त केलं. त्यांचा रोमँटिक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. 

"महाराष्ट्राचा फेवरेट कोण" या पुरस्कार सोहळ्यात रितेशने काळ्या रंगाचा सूट परिधान केला होता. तर जिनिलियानं लाल रंगाची साडी नेसली होती. रितेशचा मागच्या वर्षात ‘वेड’ हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सोहळ्यात देखील महाराष्ट्राच्या लाडक्या जोडीचा जलवा पाहायला मिळाला. रितेशच्या वेड चित्रपटाने  एक दोन नव्हे तर तब्बल ९ पुरस्कारांवर आपलं नाव कोरलं आहे. २०२२ च्या अखेरीस हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.  या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर दणक्यात कमाई केली होती. दिग्दर्शक म्हणून रितेशचा पहिला चित्रपट होता.

टॅग्स :रितेश देशमुखजेनेलिया डिसूजासेलिब्रिटीझी मराठी