Join us

प्रसाद खांडेकरची लेकासाठी भावूक पोस्ट; म्हणाला, 'बालपण एन्जॉय कर. कारण, ...'

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2023 11:41 AM

Prasad khandekar: प्रसादचा लेक बालकलाकार असून नुकतंच त्याने मराठी कलाविश्वात पदार्पण केलं आहे.

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (maharashtrachi hasyajatra) या कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे प्रसाद खांडेकर (prasad khandekar). आजवर आपल्या विनोदबुद्धीच्या जोरावर प्रेक्षकांना हसवणाऱ्या प्रसादने पहिल्यांदाच दिग्दर्शकीय क्षेत्रात पदार्पण केलं. 'एकदा येऊन तर बघा' या सिनेमाचं त्याने दिग्दर्शन केलं असून याच सिनेमाच्या माध्यमातून त्याच्या ७ वर्षाच्या मुलाने अभिनयक्षेत्रात पदार्पणही केलं आहे.

प्रसादचा मुलगा श्लोक नुकताच ७ वर्षांचा झाला आहे. त्यामुळे त्याच्या वाढदिवसानिमित्त प्रसादने पोस्ट शेअर केली आहे. त्याच्या या पोस्टमधून त्याचं बापाचं प्रेम दिसून येत आहे.

काय आहे प्रसादची पोस्ट?

गुंड्या श्लोक 7 वर्षांचा झालास यार याच वर्षी सिनेमातून "एकदा येऊन तर बघा" छोटीशी भूमिका का असेना पदार्पण केलंस... दिग्दर्शक म्हणून माझा पहिला सिनेमा आणि अभिनेता म्हणून तुझा ही पहिला सिनेमा....माझ्या नाटकाचे प्रयोग तुला पुन्हा पुन्हा पहायचे असतात आणि, फक्त बघत नाहीस तर आदल्या प्रयोगात न घेतलेली एखादी एडिशन लगेच पकडतोस आम्ही विसरलेल्या डायलॉगची पण आठवण करून देतोस .... मी सकाळी लवकर शूटला निघतो तेव्हा सुद्धा झोपलेला असतोस आणि पॅकअपनंतर उशिरा घरी येतो तेव्हा सुद्धा झोपलेला असतोस. पण, त्या झोपेत सुद्धा माझ्या गळ्याभोवती तुझ्या इवल्याश्या हातांची घडी करून आणि पाय अंगावर टाकून जेव्हा घट्ट मिठी मारतोस न सगळा थकवा निघून जातो...जगातील कुठली ही मसाजच मशीन जेवढं बॉडीला रिलॅक्स करू शकत नाही तेवढं तुझ्या एका मिठीने साध्य होत...तुझा डान्स करताना तुझं ठेक्यावर होणारं तुझं पदलालित्य ..डान्स करताना एक्सप्रेशनवर भर दे म्हटलं म्हणून क्षणाक्षणाला तुझे बदलणारे हावभाव ...लिपसिंक मॅच करायला तू केलेले प्रयत्न हे सगळं बघताना भारी वाटत ... आपल्याला येणारा कॉम्प्लेक्स हा कधीच कोणाला आवडत नाही पण तुझं इंग्रजी ऐकताना मला येणारा कॉम्प्लेक्स हा खुपच हवाहवासा वाटतो....श्लोक अजून बालपण एन्जॉय कर. कारण, तुझं लहान असणं घरातील प्रत्येक जण एन्जॉय करतोय ....बाकी ममा, आई, मम्मी आई आणि आपलं सगळं कुटुंब यांचा जीव आहेस ....जेवढं ते तुझ्यावर प्रेम करतात त्यापेक्षा तुझं त्यांच्यावर प्रेम आहे आणि ते वर्षानुवर्षे अजून वाढू दे बाकी तुझा बाबा तुझ्यासोबत आहेच.

दरम्यान, श्लोकने एकदा येऊन तर बघा या सिनेमात छोटेखानी भूमिका साकारली आहे. परंतु, त्याची भूमिका लक्षवेधी ठरत आहे. 

टॅग्स :मराठी अभिनेतामहाराष्ट्राची हास्य जत्रासिनेमाटेलिव्हिजन