मराठीतील ब्लॉकबस्टर ठरलेल्या 'माहेरची साडी' या सिनेमाला प्रदर्शित होवून बरेच वर्ष झाले असले तरी सिनेमाची जादू आजही रसिकांच्या मनात कायम आहे.सिनेमाची कथा आणि कलाकारांच्या दमदार अभिनयाने या सिनेमाने रसिकांची प्रचंड पसंती मिळवली होती. विजय कोंडके यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले होते. सिनेमात मुख्य भूमिका साकारेल्या अभिनेत्री अलका कुबल यांचा अभिनय पाहून रसिकांच्याही डोळ्यात अश्रु तरळायचे.
सिनेमात अजिंक्य देव, रमेश भाटकर यांच्या भूमिका होत्या. उषा नाडकर्णी यांनी साकारलेली खाष्ट सासू आजही रसिकांच्या चांगलीच लक्षात आहे. हा सिनेमा त्यावेळी इतका सुपरहिट ठरला होता की, सिनेमा पाहण्यासाठी रसिकांच्याही रांगा लागायच्या. गावात गावात हा सिनेमा पोहचला होता.
अलका कुबल या सिनेमामुळे रसिकांची आवडती अभिनेत्री बनल्या होत्या. अलका कुबल हे नाव महाराष्ट्रातील घराघरांत जाऊन पोहोचले.आजही अलका कुबल यांचे नाव काढताच माहेरची साडी रसिकांना नाही आठवला तर नवलच.
आजही अलका कुबल यांची जादु कायम आहे. पण तुम्हाला माहिती आहे का माहेरची साडी सिनेमासाठी अलका कुबल नव्हे तर हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री भाग्यश्री दिग्दर्शकांची पहिली पसंती होती. नव्वदीच्या दशकातला सुपरडुपर हिट 'मैने प्यार किया' सिनेमातून भाग्यश्रीने आपले एक वेगळेच स्थान निर्माण केले होते.
सिनेमाच्या वेळी भाग्यश्री केवळी १८ वर्षांची होती. फार कमी वयात अभिनयाला सुरुवात केलेल्या भाग्यश्रीने आपल्या सिनेमातही काम करावे अशी प्रत्येक दिग्दर्शकाची ईच्छा असायची. म्हणूनच दिग्दर्शक विजय कोंडके यांनाही माहरेची साडी सिनेमात अलका कुबलने साकारलेली भूमिका भाग्यश्रीलाही ऑफर केली होती.